IMPIMP

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे ‘स्टार’ प्रचारक कोरोनाबाधित

by pranjalishirish
Maharashtra Political Crisis | BJP called the corporators and office bearers in Mumbai tomorrow at 9 am

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक येत्या काही दिवसांत होत आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून BJP प्रयत्न केले जात आहेत. त्यातच भाजपचा पोटनिवडणुकीत प्रचाराचा प्रमुख चेहरा असलेल्या आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

Pravin Darekar : ‘मुख्यमंत्र्यांचं मौन म्हणजे खुर्चीसाठी शांत बसणं अन्…’

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर विधानसभेची जागा रिक्त होती. त्यानंतर आता या पदासाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे. भाजपच्या BJP प्रचाराची धुरा रणजितसिंह मोहिते पाटलांकडे आहे. आता तेच कोरोनाबाधित आढळल्याने राजकीय स्तरावर खळबळ उडाली आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी स्वत: फेसबुकवरून ही माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी क्वारंटाईन झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे, की त्यांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि स्वतःची काळजी घ्यावी.’

फक्त शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा देण्याची जबाबदारी आहे का ?

दरम्यान, भाजपचे BJP उमेदवार समाधान आवताडे आणि भाजपचे प्रमुख प्रचारक प्रशांत परिचारक यांच्या संपर्कात रणजितसिंह मोहिते-पाटील आले आहेत. त्यामुळे आता अनेकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असून, धाकधूक आहे. तसेच रणजितसिंह मोहिते-पाटील हे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत. त्यांनी अनेक मोठ्या मेळाव्यांना आणि सभांना हजेरी लावली आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांसह नेतेमंडळींना चिंता लागली आहे.

Read More : 

Coronavirus Cases India : देशात पहिल्यांदा एका दिवसात नोंदली गेली संसर्गाची 1.07 लाख प्रकरणे, केंद्राने लोकांना केले ‘हे’ आवाहन

Mini Lockdown : ‘सरकारने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली’, निर्बंधावर राऊतांचे ‘कडक’ मत

चित्रा वाघ-रुपाली चाकणकर यांच्यात रंगला ‘कलगीतुरा’ !

परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

‘मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही, आता राजीनाम्यासाठी रांग लागेल’, केंद्रीय मंत्र्याचा दावा

‘त्या’ वक्तव्यावरुन संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले -‘बहिरा नाचे आपन ताल…’

Related Posts