IMPIMP

‘शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

by pranjalishirish
param bir singh letter anil deshmukh political issue devendra fadnavis criticised sharad pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावलेले आरोप शरद पवार Sharad Pawar  यांनी फेटाळून लावले आहेत. त्यानंतर फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळी कागदपत्रे दाखवत शरद पवारांना योग्य ती माहिती दिली गेली नसल्याचा दावा केला आहे.

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
“मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांची गाडी जप्त करण्यात आली. यामध्ये सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. एटीएसने सुद्धा काहीजणांना अटक केली. याचदरम्यान माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर १०० कोटी वसुलीचा आरोप केला. ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. पण, शरद पवार Sharad Pawar यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, सिंग यांचं दावे तथ्यहिन आहेत. कारण देशमुख त्यावेळी क्वारंटाइन होते,” असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! वेतनात घसघशीत वाढ करुन वाढवले निवृत्तीचे वय, ‘या’ सरकारचा महत्त्वाचा निर्णय

यानंतर फडणवीस पुढे म्हणाले, “१५ तारखेची गृहमंत्र्यांची ही कार्यक्रम पत्रिका आहे. यामध्ये ते १५ तारखेला एका खासगी विमानाने नागपूरहून मुंबईला आले होते. जर ते १५ तारखेला आपल्या घरी होते तर मग पोलीस विभागाच्या दैनंदिन नोंदीचा एक कागद आहे. त्यात १७ फेब्रुवारीची एक तारीख आहे. त्या तारखेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत राहतील तर गृहमंत्री अनिल देशमुख हे दुपारी ३ वाजता सह्याद्रीला येतील, अशी नोंद करण्यात आली आहे. यानंतर २४ तारखेला पुन्हा अनिल देशमुख हे ११ वाजता मोटारीने निवासस्थानी जाणार असल्याची पोलिसांकडे नोंद आहे. अर्थात त्या कार्यक्रमानुसार ते गेले असतीलच असा माझा दावा नाही असेदेखील फडणवीस म्हणाले आहे. यामध्ये महत्वाची गोष्ट अशी कि परमबीर सिंग यांनी जे पत्र लिहिले होते त्यांनी मेसेजचा पुरावा दिला आहे. यामध्ये त्यानी पाटील यांना बैठकीबद्दल विचारलेलं होते. मला वाटतं शरद पवार Sharad Pawar यांना योग्य माहिती दिली गेली नाही.त्यामुळे त्यांच्या तोंडून चुकीची माहिती बोलवून घेतली गेली. हे आता उघड झालं आहे,” असा आरोप फडणवीस यांच्याकडून करण्यात आला आहे.

Also Read :

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत !’ रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

67th National Awards : ‘छिछोरे’ बेस्ट हिंदी फिल्म, तर ‘मणिकर्णिका’ साठी कंगनाला बेस्ट अ‍ॅक्ट्रेस अवॉर्ड, पहा संपूर्ण लिस्ट

परमबीर सिंगांचा आणखी एक दावा; आता घेतलं रश्मी शुक्लांचं नाव अन् म्हणाले…

Nana Patole : ‘शेतकरी संघटनांच्या 26 मार्चच्या भारत बंदला काँग्रेसचा सक्रिय पाठींबा’

HM अनिल देशमुख यांच्यासाठी शरद पवार हे ’पावर बँक’ बनण्यामागे काय आहे ‘पॉलिटिक्स’?

‘क्लीनचिट द्यायला शरद पवार न्यायाधीश नाहीत’; पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा टोला

महाविकास आघाडीसोबत 190 आमदार असल्याचा दावा; हसन मुश्रीफ यांनी दिले भाजपला ‘आव्हान’

Related Posts