IMPIMP

Devendra Fadnavis : ‘नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार शरद पवारांचा’ (व्हिडीओ)

by pranjalishirish
param bir singh now all eyes will be sharad pawar Devendra fadnavis said cause anil deshmukh corruption

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली होती. या संदर्भात परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (सोमवार) उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सीबीआयने 15 दिवसांत आपला चौकशी अहवाल न्यायालयात सादर करावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

शिवसेनेचे धारदार बाण ! म्हणाले – ‘देशातील निवडणूक आयोग ‘मृत’, EC ची भूमिका संशयास्पद’

देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करत योग्य निर्णय दिला असल्याचे म्हटले आहे. 15 दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या चौकशीत काही दोषी आढळले तर FIR नोंदवला जावा, हप्ते, वसुलीचे काम सरकारमधील मंत्र्यांच्या आशीर्वादाने होत होतं, याबद्दल हायकोर्टाने हे कडक पाऊल उचललं आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता शरद पवार यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

PM मोदी, HM शहांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यावर टीका, टीका करताना फडणवीस-पाटलांनी भान ठेवावे, नाहीतर…

निर्णय घेण्याचा अधिकार शरद पवारांचा

शरद पवार यांनीच गृहमंत्र्यांची पाठराखण केली का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, शरद पवार यांनी काय निर्णय घ्यावा, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे, ते मोठे नेते आहेत. मात्र नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, ही जबाबदारी पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आहे.

सर्वांच्या नजरा शरद पवारांकडे

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आता न्यायालयानेच चौकशीचे आदेश दिले आहेत. शरद पवार सध्या प्रकृती अस्वस्थ्येमुळे आराम करत आहेत. त्यामुळे त्यांना त्रास द्यायचा नाही, पण पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा. कारण, आता सर्वांच्या नजरा पवारसाहेबांकडे लागल्या आहेत, असेही फडणवीस Devendra Fadnavis यांनी म्हटलं आहे.

तर पुन्हा मंत्रिमंडळात घेता येईल

उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत, सीबीआय चौकशीमध्ये सर्वकाही उघड होईल. सीबीआय चौकशी होऊ नये, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. रश्मी शुक्ला अहवाल, परमबीर सिंह यांचे पत्र, हे खोटं भासवण्याचा प्रयत्न केला. गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा घेतला पाहिजे. अनिल देशमुख यांनी या पदावर राहणं योग्य नाही. चौकशीतून ते निर्दोष बाहेर पडले तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेता येईल, असेही फडणवीस म्हणाले.

‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)

उच्च न्यायालयाने काय म्हटले ?

याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणीवळी उच्च न्यायालयाने सीबीआय संचालकांना या प्रकरणी 15 दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जर यामध्ये कोणत्याही प्रकारे गुन्हा आढळून येत असेल तर एफआयआर दाखल करण्यासही म्हटले आहे.

Also Read :

मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…

Hasan Mushrif : ‘फडणवीसांना राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार, चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा’

Param Bir Singh : उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Related Posts