IMPIMP

मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?

by pranjalishirish
pimpri chinchwad municipal corporation election shiv senas strength shrirang barne against ncp Ajit Pawa

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. त्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे मिळून सरकार आहे. त्यामुळे कोणतीही निवडणूक लढवताना उमेदवाराबाबत एकमत असणे गरजेचे बनले आहे. पण पिंपरी-चिंचवड शहरात परिस्थिती वेगळीच बनल्याची चर्चा आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar  यांच्या बालेकिल्ल्यातच शिवसेना राष्ट्रवादीला शह देणार असल्याचा अंदाज आहे.

‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)

आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार  Ajit Pawar यांचे पुत्र पार्थ पवार हे लक्ष देणार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात शिवसेनेने खासदार श्रीरंग बारणे यांनी एकप्रकारे शड्डू ठोकल्याचे दिसत आहे. ही निवडणूक येत्या 10 महिन्यात होणार आहे. त्यानुसार, आता या निवडणुकीवर सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादीचा ‘डोळा’ आहे. अजित पवार यांनीही पक्षातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरु केल्या आहेत. पार्थ पवार हे या निवडणुकीत लक्ष देणार असल्याने श्रीरंग बारणे यांनी महापालिका निवडणुकीवर विशेष लक्ष देत असल्याचे दिसत आहे.

शिवसेनेचे धारदार बाण ! म्हणाले – ‘देशातील निवडणूक आयोग ‘मृत’, EC ची भूमिका संशयास्पद’

दरम्यान, या सर्व राजकीय घडामोडीनंतर राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये राजकीय कुरघोडी केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी अजित पवार  Ajit Pawar आणि श्रीरंग बारणे यांच्याकडून तयारी केली जात आहे.

PM मोदी, HM शहांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यावर टीका, टीका करताना फडणवीस-पाटलांनी भान ठेवावे, नाहीतर…

शिवसेनेकडून गटनेते कलाटे यांचा राजीनामा

महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेनेही रणनिती आखण्यास सुरवात केली. या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांचा राजीनामा घेतला. त्यामागचे कारण म्हणजे त्यांची राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांशी असलेली जवळीक हे असल्याचे दिसत आहे.

Also Read :

राहुल गांधींनी ‘या’ 2 शब्दांत साधला निवडणूक आयोगावर निशाणा

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक; 5 शहीद, 21 जण बेपत्ता

CM उद्धव ठाकरेंनी घेतला राज ठाकरेंचा समाचार, म्हणाले

Kirit Somaiya : ‘…म्हणून उद्धव ठाकरेंनी माझ्याकडून 100 कोटी वसूल करायला सांगितलंय’ (Video)

फडणवीसांचा CM ठाकरेंना टोला, म्हणाले – ‘राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास; मुख्यमंत्र्यांनी भाषण कशासाठी केलं तेच समजलं नाही’

‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…

Related Posts