PM नरेंद्र मोदींच्या बांग्लादेशी दौर्‍यावर पाकिस्तानचा सवाल, बांग्लादेश वासियांनी दिले त्यांना चोख प्रत्युत्तर

by pranjalishirish
pm Narendra modi bangladesh visit independence day pakistan objection twitter facebook erupts

ढाका/नवी दिल्ली बांगलादेश उद्या 50 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे. ज्यात भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi  प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेणार आहेत. पण, पंतप्रधान मोदी यांच्या बांगलादेश दौर्‍यावर पाकिस्तान अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. यावरून फेसबुक आणि ट्विटरवरून पाकिस्तानच्या लोकांनी अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले आहेत. तर, याला चोख प्रत्युत्तर बांगलादेशकडून दिले जात आहे.  बरेच ट्विटर यूजर्स पाकिस्तानच्या लोकांना आलं आणि साखरेची किंमत विचारत आहेत. तसेच सांगा, तुम्ही नेमकं कसे खाता? असेही प्रश्न विचारत आहेत.
विकासशील देश बना बांग्लादेश

BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

बांगलादेश बनला विकसनशील देश :
कठोर परिश्रम आणि संघर्षानंतर  बांग्लादेश  ने विकसनशील देशाचा दर्जा मिळविला आहे. त्याला संयुक्त राष्ट्र संघाने एलडीसी अर्थात कमीतकमी विकसित राष्ट्रांच्या श्रेणीतून बाहेर काढले आहे. या कामगिरीबद्दल संयुक्त राष्ट्र संघाने बांगलादेशचे अभिनंदन केले आहे. तसेच संयुक्त राष्ट्र संघाने असे नमूद केले की, बांगलादेशात मध्यम इस्लामला मानलं जातं, तसेच ते इतर धर्माचाही आदर करतात. तसेच त्यांच्या संस्कृतीचा विचार करतात. आणि पारंपारिक रीतिरिवाजांकडे आर्थिक आणि सामाजिक विकासाकडे लक्ष देतात.


चंद्रकांत पाटलांनी केलं ReTweet ! म्हणाले – ‘अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतलं गेलं अन्…’

एक देश म्हणून पाकिस्तान ठरला अपयशी :
एकीकडे बांगलादेश विकासाच्या नव्या उंचीला स्पर्श करीत असताना पाकिस्तान देशाची अर्थव्यवस्था सतत खाली जात आहे. समाज म्हणून पाकिस्तानची स्थिती अत्यंत वाईट आहे. जगातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पाकिस्तानला अपयशी देश म्हणून संबोधले आहे. जिथे इतर धर्मांचा सन्मान होत नाही किंवा शांतता प्रस्थापित करण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नाही. पाकिस्तानचे सैन्य सरकारपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय धोरणात दहशतवाद्यांचे पालन पोषण केले जात आहे. तर विकासाची बाजू बाजूला ठेवली जात आहे. जनतेला उपाशी ठेवून हा देश शस्त्रे विकत घेण्याची हौस भागवत आहे, यावर हे सिद्ध होते की, हा देश किती अपयशी आहे ते.


मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा

बांगलादेशी आणि पाकिस्तानी यांची ट्विटरवर शाब्दीक चकमक :
पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi  यांच्या दौर्‍यामुळे पाकिस्तान देशाला मिरची लागली आहे. म्हणूनच, बांगलादेशातील कट्टरपंथी संघटना हिफाजात-ए-इस्लामने सांगितले की,नरेंद्र मोदींना ढाका येथे येण्यापासून रोखले जाईल. त्यानंतर बांगलादेशातील लोकांनी हिफाजात-ए-इस्लामचा स्वीकार करण्यास सुरवात करेल. तर बांगलादेशातील जनतेने भारताबद्दलचा आदर व्यक्त करताना हिफाजात-ए-इस्लामला चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच पाकिस्तानी आयएसआयचा एजंट म्हणून हिफाजात-ए-इस्लामचे वर्णन केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बांग्लादेशात स्वागत केले जात आहे.


‘दूध का दूध, पाणी का पाणी करावं’ – गृहमंत्री अनिल देशमुख

पाकिस्तान समर्थकांनी दिले सडेतोड प्रत्युत्तर :
पाकिस्तानच्या समर्थकांना बांगलादेशच्या तरूणांनी ट्विटरवरून सडेतोड प्रत्युत्तर देणे सुरू केले आहे. त्याचवेळी, हिफाजात-ए-खिलाफतचे नेते यांना सत्तेसाठी भुकेले आणि धर्म व्यापारी असे सुद्धा म्हंटले आहे. त्याचवेळी काही पाकिस्तानी लोकांनी ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर Narendra Modi टीका करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना बांगलादेशातून गंमतीदार पध्दतीने त्यांना त्यांची पात्रता दाखवली गेली आहे. पाकिस्तान देशाची अर्थव्यवस्था, सामाजिक विकास, मुत्सद्देगिरी यासारख्या बाबींवर बांगलादेशी नागरिकांनी पाकिस्तानांकडे प्रश्न विचारण्यास सुरवात केली, तर याचे पाकिस्तानकडेे उत्तर नव्हते.

सरकारी कर्मचार्‍यांना आठवड्यात मिळेल 3 दिवसांची सुट्टी ? जाणून घ्या केंद्र सरकारचे उत्तर

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना घातला घेराव :
बांगलादेशच्या ट्विटर वापरकर्त्यांनी पाकिस्तानच्या अपयशाची मोजदाद करत प्रश्न विचारण्यास सुरूवात  केलीय. पाकिस्तानींना  पंतप्रधान  इम्रान खान यांना विचारा की, पीएमओचे वीज बिल भरले आहे का? याशिवाय बांगलादेशी ट्वीटर वापरकर्त्याने विचारले की, ’तेथे 30 रुपये अंडे आणि एक हजार रुपयांचे आलं आहे. पाकिस्तानी लोकांना सांगा की, तुम्ही काय खात आहात?, तुम्ही केवळ कोरडे गहू खात का?’ त्याचबरोबर बांगलादेशातील तरूणांनी कट्टरपंथी यांना प्रोत्साहन देण्यासाठी निधी दिल्याबद्दल पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी सरकारचा तीव्र निषेध केलाय. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या Narendra Modi  भेटीदरम्यान त्रास देण्यासाठी पाकिस्तानने कट्टरपंथी मुस्लिमांना पैसे दिले आहेत, असेही आरोप केले आहेत.

Also Read : 

Ramdas Athawale : ‘ठाकरे सरकार कलंकित, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही’

संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीत ? काँग्रेसचा संतप्त सवाल

Ration Card Latest News : रेशन घेण्याबाबत जर तुम्ही सुद्धा करत असाल ‘अशी’ चूक तर व्हा सावध, होऊ शकते 5 वर्षांची जेल

‘केरळचे लोक सुशिक्षित असल्याने भाजपला मतं मिळत नाही’, भाजप नेत्याचे वक्तव्य

मोठी बातमी ! अखेर राऊतांनी फडणवीस मुख्यमंत्री न होण्याचे सांगितलं कारण; म्हणाले…

परमबीर सिंग, गृहमंत्री देशमुख यांच्यातील वाद उच्च न्यायालयात, 30 मार्चला सुनावणी

Param Bir Singh : परमबीर सिंग यांच्याबाबत राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त येऊ शकतात अडचणीत

Related Posts

Leave a Comment