IMPIMP

PM मोदींची मोठी घोषणा ! केंद्र सरकार 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण मोफत करणार

by omkar
Narendra Modi

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन –वृत्तसंस्था – केंद्र सरकारच्या लसीकरण (Vaccination) धोरणावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज महत्त्वाची घोषणा केली आहे. देशातील लसीकरण (Vaccination) कार्यक्रम सुरु झाल्यानंतर केंद्र सरकारने (Central Government) केवळ कोविड योद्धे आणि 45 वर्षापुढील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याची जबाबदारी घेतली होती.

हसन मुश्रीफांचा गंभीर आरोप, म्हणाले- मोदी सरकारने तंबी दिल्याने अदर पुनावाला लंडनला जाऊन बसले

केंद्र सरकारने 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात परवानगी दिली. परंतु याची जबाबदारी राज्यांवर टाकली होती.
मात्र, आता 18 वर्षापुढील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार आहे.
18 वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लागणाऱ्या लशींचा साठा केंद्र सरकार मोफत करणार आहे.

काय म्हणाले PM Narendra Modi?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, लसीकरणाची 25 टक्के जबाबदारी ही राज्य सरकारांची होती. ती जबाबदारीही भारत सरकार घेईल.
येत्या 2 आठवड्यात ही व्यवस्था लागू केली जाईल.
या दोन आठवड्यांत केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक तयारी करतील.
भारत सरकार स्वत: लस उत्पादकांकडून एकूण लस उत्पादनापैकी 75 टक्के खरेदी करुन ती राज्य सरकारांना विनाशुल्क देईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Also Read:- 

Sachin Vaze | नालेसफाई करणार्‍या कंत्राटदाराकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी वाझेवर होती, भाजपकडून आरोप

Pune Crime News | वाहन आणि मोबाईल चोरी करणार्‍या सराईतांना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकानं पकडलं, 7 गुन्हयांची उकल

तुमच्या स्मार्टफोनवर ‘गुगल’ कोणत्या गोष्टींना करत आहे रेकॉर्ड, मिनिटात ‘या’ पद्धतीने जाणून घ्या

PM मोदींना सहकाऱ्यांचा विसर? गडकरींपाठोपाठ योगींनाही दिल्या नाहीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Bill and Melinda Gates | …म्हणून तब्बल 27 वर्षांनंतर बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी घेतला घटस्फोट, जाणून घ्या

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

Related Posts