IMPIMP

Pune Corporation Amenity Space | अ‍ॅमेनिटी स्पेसवरून ‘आप’चे महापालिकेत आंदोलन, भाजपा-राष्ट्रवादीविरोधात जोरदार घोषणाबाजी

by nagesh
Pune Corporation Amenity Space | AAP's agitation in the Municipal Corporation from the amenity space, loud sloganeering against BJP-NCP

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Corporation Amenity Space | अ‍ॅमेनिटी स्पेसवरून पालिकेतील राजकारण चांगलेच तापले आहे. शहरातील ‘शेकडो’ जागा दीर्घकालीन मुदतीवर भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाविरोधात आम आदमी पार्टीच्यावतीने (aam aadmi party – AAP) पालिकेत आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी (NCP) आणि सत्ताधारी भाजपाच्याविरोधात (BJP) जोरदार घोषणाबाजी (Pune Corporation Amenity Space) करण्यात आली.

 

सत्ताधारी भाजपाने या जागा भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये यापूर्वीच मंजूर केलेला आहे. हा प्रस्ताव मुख्यसभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. मात्र, या प्रस्तावाला राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसने विरोध केलेला आहे. हा विरोध डावलून भाजपाने प्रस्ताव मंजूर करण्याचा घाट घातला होता. दरम्यान, राष्ट्रवादीने अचानक विरोध मागे घेत काही अटींवर प्रस्तावाच्या बाजूने वक्तव्य दिले.

खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण (adv mp vandana chavan) यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
त्यानंतर पालिकेतील महाविकास आघाडीतील अन्य पक्षांमध्ये चुळबुळ सुरू झाली.
मात्र, काँग्रेस आणि शिवसेनेने (Shivsena) विरोध कायम ठेवला.
दरम्यान, राष्ट्रवादीने अचानक बैठक घेत या प्रस्तावाला विरोध कायम असल्याचे जाहीर केले.

आम आदमी पार्टीने मात्र सुरुवातीपासून या निर्णयाला विरोध केला आहे.
गुरुवारी दुपारी मुख्यसभा असल्याने आपने पालिकेच्या जुन्या इमारतीच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले.
‘भाजपा-राष्ट्रवादी भाऊ-भाऊ, दोघे मिळून खाऊ’ अशा घोषणा दिल्या.

 

Web Title : Pune Corporation Amenity Space | AAP’s agitation in the Municipal Corporation from the amenity space, loud sloganeering against BJP-NCP

 

हे देखील वाचा :

Ramdas Athavale | रामदास आठवलेंसह रिपब्लिकन पक्षाचे नेते नारायण राणेंच्या भेटीला, दिला हा महत्वाचा सल्ला

FIR on Police Inspector | पोलिसाची सटकली ! पान द्यायला झाला उशीर, रिक्षाचालकाला बेदम मारहाण, पोलीस निरीक्षकासह तिघांवर FIR

Tax Benefits on Home Loan | फायद्याची गोष्ट ! होम लोनवर कशाप्रकारचे मिळतात TAX बेनिफिट्स, जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts