IMPIMP

कोरोना प्रतिबंधक नियम पाळून MPSC ची परीक्षा व्हावी – राेहित पवार

by pranjalishirish
reconsider-decision-to-postpone-mpsc-exams-request-by-ncp-mla-rohit-pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने येत्या रविवारी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्या असून, यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी एमपीएससीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यापुढे कोरोनामुळे कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील, असा विश्वास आहे. त्यानुसारच एमपीएससीची परीक्षाही झाली पाहिजे, असे आवाहन आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केले आहे.

रोहित पवार Rohit Pawar यांनी एमपीएससीबाबत ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. दरम्यान, पुण्यात एमपीएससीची परीक्षा देणारे विद्यार्थी रस्त्यावर आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त करत ठिय्या आंदोलन केले आहे. हे आंदोलन नव्या पेठेतील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी या आंदोलक विद्यार्थ्यांना रस्त्यातून हटवण्यास सुरुवात केल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू झाला.

दरम्यान, कोरोना पार्श्वभूमीवर मागील वर्षभरात पाच वेळा एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच आयोगाने प्रसिद्धिपत्रक जाहीर करून ही माहिती दिली आहे. यापूर्वी ११ ऑक्टोबर २०२० रोजी राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार होती. मात्र, तेव्हाही मराठा आरक्षण प्रश्नांबाबत महिला संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे परत परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

Alos Read :

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपूरला जाऊन घेतली सरसंघचालकांची भेट, राजकीय वर्तुळात च

Related Posts