IMPIMP

‘एका पांचट पत्रावरून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे राजीनामे घेतले तर…’

by pranjalishirish
sanjay raut react anil deshmukh resignation and told sharad pawar clarified param bir singh

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी पत्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर पत्र लिहित अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या लेटरबॉम्बमुळं सध्या सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरू आहे. सोमवारी संसदेतही यावरून गदारोळ झाला. भाजपसह इतर पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. दरम्यान कालच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केलेले आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही असंही ते म्हणाले. यानंतर आता आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांनी मांडलेली भूमिका हीच सरकारची भूमिका असल्याचं स्पष्ट केलं. एका पांचट पत्रावरून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे राजीनामे घेतले तर केंद्र सरकार किंवा कोणत्याच राज्यात सरकार काम करू शकणार नाही असंही राऊत म्हणाले.

पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवरुन फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले- ‘मी आजच केंद्रीय गृहसचिवांना भेटतोय’

‘एका पांचट पत्रावरून राजीनामे घेतले तर कोणत्याच राज्यात सरकार काम करू शकणार नाही’

संजय राऊत म्हणाले, गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh  यांच्या राजीनाम्याविषयी शरद पवार यांनी मांडलेली भूमिका हीच सरकारची भूमिका आहे. एका पांचट पत्रावरून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे राजीनामे घेतले तर केंद्र सरकार किंवा कोणत्याच राज्यात सरकार काम करू शकणार नाही. गुजरातमधील अधिकारी संजीव भट यांनी लिहिलेल्या पत्रात अनेक गंभीर आरोप होते. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता का ? असा सवालही राऊत यांनी केला.

‘शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

‘…तर भाजपचे नेते थयथयाट करतील का ?’

पुढं बोलताना संजय राऊत म्हणाले, तेव्हा सरकारनं भट यांचं थेट निलंबन केलं होतं. ही पत्रे आता बाहेर आली की, भाजपचे नेते थयथयाट करतील का ? त्यांना बँड बाजा आम्ही पुरवू असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी बोलताना लगावला.

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! वेतनात घसघशीत वाढ करुन वाढवले निवृत्तीचे वय, ‘या’ सरकारचा महत्त्वाचा निर्णय

काय म्हणाले होते शरद पवार ?

शरद पवार म्हणाले होते की, अनिल देशमुख  Anil Deshmukh फेब्रुवारी महिन्यात 5 ते 15 तारखेपर्यंत कोरोनामुळं रुग्णालयात दाखल होते. 15 फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते 15 ते 27 फेब्रुवारी दरम्यान नागपुरात राहत्या घरी क्वारंटाईन होते. त्यामुळं परमबीर सिंग यांनी केलेले आरोप आणि वस्तुस्थिती यात खूप फरक आहे. अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात कुणाला भेटण्याची शक्यताच नव्हती हे सिद्ध झालं आहे असंही पवारांनी सांगितलं.

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

‘वाझे-देशमुख भेटीची चर्चाच खोटी’

‘वाझे-देशमुख’ यांच्या भेटीवर बोलताना शरद पवार म्हणाले, फेब्रुवारी महिन्यात अनिल देशमुख  Anil Deshmukh कोरोनामुळं रुग्णालयात होते. त्यानंतर ते क्वारंटाईन होते. त्यामुळं या काळात सचिन वाझे (Sachin Vaze) आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची शक्यताच नाही. त्यामुळं परमबीर सिंग यांचे आरोप खोटे असल्याचं दिसून येत आहे असंही त्यांनी सांगितलं होतं.

Also Read :

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत !’ रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

67th National Awards : ‘छिछोरे’ बेस्ट हिंदी फिल्म, तर ‘मणिकर्णिका’ साठी कंगनाला बेस्ट अ‍ॅक्ट्रेस अवॉर्ड, पहा संपूर्ण लिस्ट

परमबीर सिंगांचा आणखी एक दावा; आता घेतलं रश्मी शुक्लांचं नाव अन् म्हणाले…

Nana Patole : ‘शेतकरी संघटनांच्या 26 मार्चच्या भारत बंदला काँग्रेसचा सक्रिय पाठींबा’

HM अनिल देशमुख यांच्यासाठी शरद पवार हे ’पावर बँक’ बनण्यामागे काय आहे ‘पॉलिटिक्स’?

‘क्लीनचिट द्यायला शरद पवार न्यायाधीश नाहीत’; पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा टोला

महाविकास आघाडीसोबत 190 आमदार असल्याचा दावा; हसन मुश्रीफ यांनी दिले भाजपला ‘आव्हान’

Related Posts