IMPIMP

सचिन वाझेंचा शिवसेनेसोबत संबंध?, संजय राऊत म्हणाले -‘शिवसेना ही बंदी घातलेली संघटना नाही’

by bali123
sanjay raut reaction on sachin vaze and shivsena connection

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – सचिन वाझे प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारला चांगलचं घेरलं आहे. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच सचिन वाझे यांना शिवसेनेने पाठीशी घातल्याने सचिन वाझे आणि शिवसेना यांच्यामध्ये संबंध असल्याची चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत sanjay raut यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे.

सचिन वाझे आणि शिवसेनेत संबंध असल्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना राऊत यांनी सांगितले की, एखादी व्यक्ती पूर्वी शिवसेनेत किंवा राजकीय पक्षासोबत संबंधित असले तर ते चुकीचे आहे का ? असा प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी शिवसेना ही बंदी घातलेली संघटना नाही. प्रत्येक मराठी माणसाचा शिवसेनेशी संबंध असल्याचे संजय राऊत sanjay raut यांनी सांगितले.

एका API मुळे सरकार अस्थिर होणार नाही
सचिन वाझे प्रकरणावर बोलताना राऊत म्हणाले, सचिन वाझे प्रकरणात कोणतीही घडामोड होताना दिसत नाही. शिवाय, एका एपीआयमुळे सरकार अस्थिर झाले या भ्रमातून बाहेर पडले पाहिजे. दिल्लीतील चंद्रशेखर यांचे सरकार केवळ दोन हवालदरांमुळे कोसळले होते. मात्र, महाराष्ट्रात तसे काही होणार नाही, असेही सांगत राऊत यांनी विरोधकांना फटकारले आहे.

हा अधिकार शरद पवार यांनाही
मंत्रीमंडळातील खाते बदलाबद्दल बोलताना संजय राऊत sanjay raut म्हणाले, महाविकास आघाडीचे हे सरकार तीन पक्षांचे आहे. तिन्ही पक्षांचे प्रमुख यासंदर्भात निर्णय घेतील. मुख्यमंत्री हे कॅबिनेटचे प्रमुख असल्याने तेच ठरवणार कोणत्या मंत्र्याच्या प्रगती पुस्तकात कोणता शेरा लिहायचा. अर्थात हा अधिकार शरद पवार यांनाही असल्याचे राऊत यांनी सांगितले.

56 % कोरोना लसी वापराविना पडून; केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले…

Sanjay Raut : ‘वाझे प्रकरणामुळं सरकार अस्थिर झालं यात तथ्य नाही, सरकार पडणं शक्य नाही’

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! पगारात होणार मोठ्या प्रमाणात वाढ

पंढरपूरची पोटनिवडणूक जाहीर ! 17 एप्रिलला होणार मतदान, राष्ट्रवादीकडून कोणाला संधी?

Related Posts