IMPIMP

56 % कोरोना लसी वापराविना पडून; केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले…

by bali123
Maharashtra Government had only used 23 lakh vaccines out of the total 54 lakh vaccines sent to the state, till 12th March

नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे देशभरात लसीकरण मोहीमही सुरु आहे. महाराष्ट्र राज्यासाठी आणखी लसींची मागणी शिवसेना खासदारांकडून केली जात आहे. त्यावर केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर prakash javadekar यांनी शिवसेनेला टोला लगावला.

राज्यासह देशभरात कोरोना लसीकरण सुरु आहे. केंद्र सरकारकडून 54 लाख डोस राज्याला देण्यात आले आहेत. तरीही आणखी काही डोसची मागणी शिवसेना खासदारांकडून केली जात आहे. त्यावर जावडेकर prakash javadekar यांनी ट्विट करत समाचार घेतला. त्यामध्ये म्हटले, की ‘महाराष्ट्र सरकारला 12 मार्चपर्यंत 54 लाख लसींचा पुरवाठा करण्यात आला आहे. मात्र, त्यापैकी फक्त 23 लाख लसींचे डोस वापरण्यात आला आहे. म्हणजेच 56 टक्के लसींचा वापर अद्याप केला गेला नाही. तरीही आता शिवसेना खासदार राज्यासाठी आणखी लसींची मागणी करत आहेत. पहिल्यांदा या महामारीचे व्यवस्थापन नीट केले नाही आणि आता लसींसाठी योग्य प्रशासनही नाही’.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्णसंख्या वाढीसोबतच मृतांची संख्याही वाढत आहे. त्यानुसार, लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याच लसींच्या मुद्यावरून शिवसेना खासदारांनी आणखी लसींची मागणी केली आहे. त्यावर प्रकाश जावडेकर यांनी निशाणा साधला.

Sanjay Raut : ‘वाझे प्रकरणामुळं सरकार अस्थिर झालं यात तथ्य नाही, सरकार पडणं शक्य नाही’

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! पगारात होणार मोठ्या प्रमाणात वाढ

पंढरपूरची पोटनिवडणूक जाहीर ! 17 एप्रिलला होणार मतदान, राष्ट्रवादीकडून कोणाला संधी?

Related Posts