IMPIMP

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! पगारात होणार मोठ्या प्रमाणात वाढ

by bali123
big benefits government employees increase salaries

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना government employees पुढील महिन्यात चांगलाच फायदा होणार आहे कारण पुढील महिन्यांत महागाई भत्त्यासह सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कोरोनाच्या काळात त्यांना जानेवारी २०२० ते जुलै २०२० आणि जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत त्यांना ७ टक्के महागाई भत्ता देण्यात आला नव्हता. मात्र आता जानेवारी ते जुलैपर्यंतच्या महागाई भत्ता पुढील महिन्यात जाहीर होणार आहे. तो भत्ता ४ टक्के असणार आहे.

सरकारने महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्यानंतर त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावरही होणार आहे. सरकारी नियमानुसार बेसिक पगाराला अनुसरुन पीएफ आणि ग्रॅज्युएटी कट होते. पगाराच्या नवीन नियमानुसार सीटीसीमध्ये मूळ पगार ५० टक्क्यापेक्षा कमी नसला पाहिजे. डीए म्हणजेच महागाई भत्ता वाढणार असल्याने याचा फायदा सर्वच पेन्शनधारकांना होणार आहे. डीएमध्ये होणाऱ्या वाढीमुळे पेन्शनर्संना आता १० हजारऐवजी १६ हजार रुपये पेन्शन दर महिन्याला मिळणार आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन कामगार कायदा लागू होणार आहे. केंद्र सरकारकडून १ एप्रिलपासून नवीन कामगार कायद्याच्या नियमावलीची अंमलबजावणी केली जाऊ शकते.

नवीन कामगार कायद्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या government employees पगारावर त्याचा फरक पडणार आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना १७ टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. जुलै २०१९ पासून याच दराने डीए म्हणजेच महागाई भत्ता मिळत आहे. जानेवारी २०२० पासून नवीन डीए लागू करण्यात येणार पण कोरोना महामारीमुळे जुलै २०२० आणि जानेवारी २०२१ पर्यंतचा डीए रद्द करण्यात आला होता. त्यामुळे येत्या आर्थिक वर्षात वाढीव महागाई भत्त्यानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना २१ टक्क्यंपर्यंत डीए मिळणार आहे. मागच्या वर्षी केंद्र सरकारने महाभाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता १ जुलैपासून महागाई भत्त्यात वाढ होण्याची अपेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पंढरपूरची पोटनिवडणूक जाहीर ! 17 एप्रिलला होणार मतदान, राष्ट्रवादीकडून कोणाला संधी?

Related Posts