IMPIMP

Sachin Vaze : ‘काल पर्यंत सचिन वाझे प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी म्हणणाऱ्या संजय राऊतांचा यू-टर्न, NIA ने चौकशी करावी’

by pranjalishirish
sanjay raut should be questioned nia sachin vaze case congress leader sanjay nirupam

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- शिवसेनेसोबत काँग्रेसने आघाडी करण्यास सुरुवातीपासून विरोध करणारे काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम sanjay nirupam यांनी शिवसेनेच्या विरोधात हल्ले सुरुच ठेवले आहेत. आता सचिन वाझे प्रकरणावरुन निरुपम यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. संजय निरुपम यांनी महाविकास आघाडीच्या संकल्पनेला विरोध केला होता. सरकारला दीड वर्षे होऊन गेल्यानंतरही त्यांचा हा विरोध आजही कायम आहे.

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली गाडी आढळल्यानंतर एनआयएने या प्रकरणाचा तपास हाती घेतला. त्यातच गाडी मालक मनसुख हिरेने यांची हत्या झाल्याचे समोर आलं. याप्रकरणी तपास अधिकारी सचिन वाझे याला अटक झाल्याने ठाकरे सरकारची कोंडी झाली. सुरुवातीला सचिन वाझे यांची ठामपणे पाठराखण करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता यू-टर्न घेतला आहे. यावरुन संजय निरुपम  sanjay nirupam यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

याच वाक्तव्यावरुन निरुपम यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. वाझेंना पुन्हा पोलीस सेवेत घेण्यास माझा विरोध होता, असं आता संजय राऊत म्हणतात. कालपर्यंत हेच राऊत वाझेंचं समर्थन करत होते. वाझे प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकारी असल्याचं म्हणत होते. आता ते काहीही म्हणत असले तरी सचिन वाझा हा कोणाच्या पाठिंब्यानं पुन्हा सेवेत आला हे लोकांसमोर आलेच पाहिजे, असं निरुपम यांनी म्हटले आहे. तसेच एनआयएनं संजय राऊत यांच्यासारख्या बेताल बडबड करणाऱ्या लोकांना उचलून त्यांची चौकशी केली पाहिजे आणि वाझेच्या कर्त्या-करवित्यापर्यंत पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षाही निरुपम  sanjay nirupam यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

काय म्हणाले होते राऊत ?

सचिन वाझे यांची काम करण्याची पद्धत वादग्रस्त आहे. त्यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणी येऊ शकते, असा इशारा मी वाझेंना पोलीस सेवेत पुन्हा रुजू करुन घेतले गेले, तेव्हाच दिला होता. शिवसेनेच्या कोणत्या नेत्यांना मी हे सांगितलं होतं त्यांची नाव उघड करु इच्छित नाही, असं संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते.

Also Read:

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

सचिन, पठाण बंधू यांच्यानंतर भारतीय टीमच्या ‘या’ कर्णधाराला कोरोनाची लागण

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

‘कोरोनाच्या सेकंड म्युटंटप्रमाणेच गुन्हेगारीचं रूपही बदलतंय’ : CM उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांबाबत केलं महत्वपूर्ण विधान; म्हणाले, ‘…भानावर राहावेच लागेल’

Related Posts