IMPIMP

मिठाच्या खड्यावरुन संजय राऊतांचा अजित पवारांवर ‘निशाणा’, म्हणाले -‘गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे दूर होणे कठीण’

by pranjalishirish
sanjay rauts arrow rock salt bjp critisize ajit pawars ear

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कथित गुप्त भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवरून शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांचे सरकार असताना साम-दाम-दंड भेद वापरून सत्ता टिकवण्याची भाषा केली जात होती. हा साम-दाम-दंड भेद इतरांच्या हातीही असू शकतो. तेव्हा अहमदाबादच्या गुप्त बैठकीची अफवा पसरवून गोंधळ घालणे हा त्याच भेद-नीतीचा प्रयोग आहे. यामधून काय साध्य होणार ? शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर आघात करुन महाराष्ट्राचे सरकार कमकुवत करायचे, असे भाजपचे डावपेच आहेत, असा आरोप शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केला आहे. शिवसेनेने भाजपवर टीकेचे बाण सोडताना उपमुख्यमंत्री अजित पवार  Ajit Pawar यांनाही कानपिचक्या घेतल्या आहेत.

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

केंद्रीय तपास यंत्रणांचे दाबदबाव व राज्यपालांचे विशेष सहाय्य घेऊनही महाराष्ट्र सरकार जागचे ढिम्म हलायला तयार नाही. त्यामुळे विरोधकांना वैफल्याचा आजार जडला आहे. सध्या शरद पवार थोडे आजारी आहेत. त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया होत आहे, पण वैफल्य व निराशा यामुळे पित्त खवळले आहे ते भाजपचे. पवार  Ajit Pawar लवकरच बरे होऊन कामास लागतील. भाजपने गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल रोखठोक मत मांडल्यानंतर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच कुणीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करुन नये असा सल्लावजा इशारा अजित पवार यांनी नुकताच दिला होता. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून अजित पवार यांच्या वक्तव्याचा धागा पकडून भाजपवर निशाणा साधला आहे.

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

भल्या पहाटे मिठाचा खडा टाकून दूध नासवायचा प्रयत्न एकदा भलेही झाला, मात्र आता तसा काही नासवानासवीचा प्रकार होऊ शकणार नाही. एक वेळ दुधात पडलेला मिटाचा खडा बाहेर काढता येईल, पण गुळाच्या ठेपेला चिकटलेले मुंगळे दूर होणे कठीण, असा सध्याचा सिद्धांत आहे, अशा शब्दात अग्रलेखातून अजित पवारांना कानपिचक्या घेण्यात आल्या आहेत.

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

काय म्हणाले होते अजित पवार ?

अजित पवार Ajit Pawar  म्हणाले, राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे शिवसेनेत कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतात. काँग्रेसमध्ये देखील मंत्रीपद देण्याचा अधिकार सोनिया गांधी यांना आहे. त्या प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणाला मंत्रीपद देयचे याचा अधिकार शरद पवार यांना आहे. शरद पवार यांना 50 वर्षाचा राजकीय अनुभव आहे. त्यामुळे कोणाला मंत्रीपद देयचे आणि कोणता विभाग देयचा हे तेच ठरवतात. इतरांनी वक्तव्य केलं तर समजू शकतो. पण महाविकास आघाडीमध्ये असताना मान्यवरांनी एकमेकांना अडचणीत आणण्याचे वक्तव्य करु नये. तसेच संजय राऊत यांना चांगले माहित आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार हेच निर्णय घेत असतात. शरद पवार यांनी या राज्याचे मुख्यमंत्री कोण असावे, हे काँग्रेससोबत आघाडी असताना ठरवले आहे. यामुळे कुणी मिठाचा खडा टाकण्याचे काम करु नये, अशा शब्दात अजित पवार यांनी संजय राऊत यांना फटकारलं होतं.

Also Read:

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

MPSC परीक्षेतून होणारा भाजपचा प्रचार थांबवा : यशोमती ठाकूर

पवार-शहा भेटीबद्दल प्रफुल्ल पटेल यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, राज्य सरकार स्थिर’

इंदुरीकर महाराजांना मोठा दिलासा ! न्यायालयानं रद्द केला ‘तो’ खटला

1 एप्रिलपासून कामाचे तास, वेतन बदलणार; जाणून घ्या सरकारचा प्लॅन

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

Related Posts