IMPIMP

शरद पवार आणि अमित शहांची बहुचर्चित भेट ? 2 दिग्गज नेत्यांच्या भेटीबाबत राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया ! कोण काय म्हणाले ? जाणून घ्या

by pranjalishirish
sharad pawar and amit shah meeting know the details about it political reaction

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- अँटिलिया आणि मनसुख हिरेन प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली असताना मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांनी लेटरबॉम्ब टाकला. या सर्व घडामोडीं घडत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खलबतं होत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar  आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये झालेल्या गुप्त बैठकीचे वृत्त समोर आले. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येणार अशी चर्चा सुरु झाली. त्यातच या भेटीसंदर्भात अमित शहांनी मोठे विधान केले. यानंतर सर्वच स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीने अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे सांगितले आहे. तर या दोन नेत्यांमध्ये भेट झाली असली तरी गैर काय असे भाजपने म्हटले आहे.

संतापलेल्या भाजप खासदार बाबुल सुप्रियोंनी थेट कार्यकर्त्यांच्या श्रीमुखात लगावली, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

सगळ्या गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत – अमित शहा

अमित शहा यांना काल पत्रकारांनी शरद पवारांच्या Sharad Pawar भेटीसंदर्भात प्रश्न विचारला. यावर बोलताना अमित शहा यांनी एकाच वाक्यात उत्तर देत सूचक विधान केले आहे. सगळ्या गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत, असं सूचक विधान अमित शहा यांनी केलं आहे. अमित शहांच वक्तव्य हे शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीवर शिक्कामोर्तब करणारं असल्याची चर्चा आहे.


CM उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, केली प्रकृतीची विचारपूस

पवार साहेब-अमित शहा भेट झालेली नाही – जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड म्हणाले, पवार Sharad Pawar  साहेब-अमित शहा भेट झाली नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तरी आमचे काही पत्रकार मंडळी रंग उधळत आहेत. चघळायला काही नसले की अफवेभोवती दोन दिवस घालवता येतात. हेच या बातमीच्या रुपाने सिद्ध होतं. माझ्या सर्व पत्रकार बांधवांना होळीच्या शुभेच्छा ! बुरा ना मानो होली है, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

देशाला याची माहिती असलायला हवी – संदीप दीक्षित

काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित म्हणाले की, गृहमंत्री एखाद्या मोठ्या नेत्याला भेटत असतील तर देशाला याची माहिती असायला हवी. दोन्ही नेत्यांमध्ये काय बातचीत झाली हे देशाला कळायला हवं.


‘आधी म्हणाले नव्या पिढीला शरद पवार यांचं राजकारण कळणार नाही, आता म्हणत आहेत ‘ती’ फक्त अफवा’

अफवांची धुळवड थांबवा – संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, शरद पवार-अमित शहा यांच्या भेटीत काय सस्पेन्स आहे ? शरद पवार Sharad Pawar  आणि अमित शहा यांच्यात भेट झाली की नाही याची माहिती नाही. मात्र, अमित शहा आणि शरद पवार यांच्या भेटीत चुकीचं काही नाही. देशाच्या गृहमंत्र्यांना एखादा मोठा नेता भेटतो यात चुकीचे काय आहे. आम्ही देखील गृहमंत्र्यांना भेटू शकतो. कामानिमित्ताने भेट झाली असेल तर चुकीचे काहीच नाही, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले की, मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजिबात झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


Sanjay Raut : ‘आता तरी रहस्य कथेचा शेवट करा, अफवांची धुळवड थांबवा’

अशा प्रकारच्या भेटी होतच असतात – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या भेटी होतच असतात. यामध्ये नवीन काही नाही. अमित शहांच्या वक्तव्यावरुन भेट झाली असावी असे वाटते. शरद पवार आणि अमित शहा यांची भेट खूप निवांत झाली. मात्र, ही भेट का झाली त्याबद्दल मी अनभिज्ञ असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

अद्याप कोणतीही बैठक झालेली नाही – नवाब मलिक

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले की, गुजरातमधील एका वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे की शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल यांनी अमित शहा यांची भेट घेतली. गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर अशा अफवा उडवल्या जात आहेत. अशी कोणतीही बैठक अद्याप झाली नसल्याचे मलिक यांनी सांगितले. भाजपवर हल्लाबोल करताना मलिक म्हणाले, भाजप बैठकीबद्दल अफवा पसरवत आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल जयपूर येथून थेट मुंबईत परतले होते.

 

Also Read

संजय राऊतांचा फडणवीसांवर घणाघात, म्हणाले – ‘राज्यातला नेता जेव्हा वारंवार दिल्लीकडे तोंड करून बघतो’

Video : ‘एवढं तर मी मुख्यमंत्र्यांसाठी देखील करत नाही’, भाजपनं शेअर केला संतापलेल्या नुसरत जहाँचा व्हिडीओ

पवार-शहा भेटीवर भाजपची अधिकृत भूमिका, प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

शरद पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द, सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत माहिती

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

निवृत्त न्यायमूर्तींकडून ‘त्या’ प्रकरणाची चौकशी करण्यात येणार !

Related Posts