IMPIMP

Video : अरविंद सावंत यांनी फेटाळला नवनीत राणा यांचा आरोप, म्हणाले – ‘मी शिवसैनिक आहे, महिलांना धमक्या देत नाही’

by pranjalishirish
shiv sena mp arvind sawant rejects all allegations amravati mp navneet rana

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navaneet Rana)यांनी आरोप केला आहे की, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना राणा यांनी पत्रही लिहित तसा दावा केला आहे. अरविंद सावंत यांनी मात्र नवनीत राणांचे हे धमकीचे आरोप फेटाळून लावले आहेत. मी आजवर कधी कोणाला धमकी दिलेली नाही. महिलेला धमकावण्याचा तर प्रश्नच येत नाही. मी शिवसैनिक आहे. माझ्याकडून असं कधीच होणार नाही असंही ते म्हणाले.

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

सचिन वाझे प्रकरणी संसदेत आवाज उठवल्यामुळं अरविंद सावंत Arvind Sawant यांनी मला धमकी दिली अशी तक्रार राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तू महाराष्ट्रात कशी फिरते, ते मी पाहतो अशा शब्दात अरविंद सावंत यांनी धमकी दिल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. त्यावरून शिवसेनेवर टीका होत असताना अरविंद सावंत यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! वेतनात घसघशीत वाढ करुन वाढवले निवृत्तीचे वय, ‘या’ सरकारचा महत्त्वाचा निर्णय

नेमकं काय म्हणाले अरविंद सावंत ?

याबाबत बोलताना अरविंद सावंत Arvind Sawant म्हणाले, नवनीत राणा जेव्हा कधी मला संसदेत भेटतात तेव्हा दादा, भैया म्हणून हाक मारतता. मी देखील अनेकदा त्यांच्याशी बोलत असतो. काही गोष्टींच्या बाबतीत त्यांना समजावत असतो. परंतु धमकी वगैरे देण्याचा प्रश्नच येत नाही. उलट त्याच लोकांना धमक्या देत असतात. त्यांना राईचा पर्वत करण्याची सवय आहे. मागच्या एका वर्षातील त्यांची लोकसभेतील भाषणं बघा. विशेषत: महाराष्ट्र सरकार व शिवसेना विरोधात त्याची बोलण्याची पद्धत, शब्द बघा तुमच्या लक्षात येईल असंही सावंत म्हणाले.

‘त्यांचा शिवसेनेवर राग आहे, त्या सतत शिवसेनेवर टीका करतात’

पुढं बोलताना सावंत Arvind Sawant म्हणाले, नवनीत राणा यांच्याविरोधात शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळं त्यांचा शिवसेनेवर राग आहे. त्या सतत शिवसेनेवर टीका करतात. लोकसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन व्यक्तिगत टिप्पणी करत असतात. मी त्यांना त्याबद्दलही अनेकदा समजावलं आहे. मात्र त्यांना धमकी कधीच दिली नाही. माझी ती भाषाही नाही. संसदेच्या लॉबीत मी त्यांना धमकी दिली असं त्यांचं म्हणणं असेल तर किमान आजूबाजूच्या लोकांना तरी माहित असेल.

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

‘…तर मी नवनीत राणा यांच्या बाजूनं उभा राहिन’

अरविंद सावंत असंही म्हणाले, चेहऱ्यावर अॅसिड फेकून तुझा चेहरा विद्रूप करेन असं कोण त्यांना बोललं असेल मी स्वत: त्या गोष्टीचा निषेध करतो. ही अत्यंत घृणास्पद बाब आहे. अशी धमकी जर त्यांना कोणी दिली असेल तर मी नवनीत राणा यांच्या बाजूनं उभा राहिन असंही सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

Also Read :

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत !’ रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

67th National Awards : ‘छिछोरे’ बेस्ट हिंदी फिल्म, तर ‘मणिकर्णिका’ साठी कंगनाला बेस्ट अ‍ॅक्ट्रेस अवॉर्ड, पहा संपूर्ण लिस्ट

परमबीर सिंगांचा आणखी एक दावा; आता घेतलं रश्मी शुक्लांचं नाव अन् म्हणाले…

Nana Patole : ‘शेतकरी संघटनांच्या 26 मार्चच्या भारत बंदला काँग्रेसचा सक्रिय पाठींबा’

HM अनिल देशमुख यांच्यासाठी शरद पवार हे ’पावर बँक’ बनण्यामागे काय आहे ‘पॉलिटिक्स’?

‘क्लीनचिट द्यायला शरद पवार न्यायाधीश नाहीत’; पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा टोला

महाविकास आघाडीसोबत 190 आमदार असल्याचा दावा; हसन मुश्रीफ यांनी दिले भाजपला ‘आव्हान’

Related Posts