IMPIMP

शिवेंद्रसिंहराजे म्हणतात – ‘व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा…’

by bali123
shivendraraje bhosale comment lockdown 20201 satara

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन – बांधकाम व्यवसाय सुरु ठेवला आणि त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी बंद ठेवल्या आहेत. पण अत्यावश्यक सेवेतील दुकानात कोरोना होत नाही आणि कापड दुकानात होतो, असे काही संशोधन झाले आहे का? जिल्हा आणि राज्य शासनाने सोमवार ते शुक्रवार या कालावधीसाठी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले shivendraraje bhosale यांनी केले आहे.

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. त्यामध्ये अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यावरून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आमदार शिवेंद्रसिंहराजे shivendraraje bhosale यांनी व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी सुरु ठेवल्या पाहिजेत. ज्या नको त्या बंद ठेवा. एकदम निर्णय घेऊन व्यापारी आणि नागरिकांची कुचंबणा केली आहे. सगळा विचित्र कारभार आहे. इतर व्यवसाय सुरु ठेवत आहात. बांधकाम व्यवसाय सुरु ठेवला आणि त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी बंद ठेवल्या आहेत. पण अत्यावश्यक सेवेतील दुकानात कोरोना होत नाही आणि कापड दुकानात होतो, असे काही संशोधन झाले आहे का?’

चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य, म्हणाले – ‘कुणाच्या कुबड्या न घेता 2024 मध्ये स्वबळावर सरकार स्थापन करणार, आणि…’

तसेच ते पुढे म्हणाले, ‘जास्तीत जास्त काय होणार 144 कलमचा भंग होऊन गुन्हे दाखल होतील. धंदा बंद ठेवून, व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा जेलमध्ये बसलेले बरे, अशी भावना व्यापाऱ्यांची होईल. दहावी-बारावीच्या विद्यार्थांना स्टेशनरीची आवश्यकता भासल्यास त्यांनी कोठे जायचे? जिल्हा प्रशासनाने व्यापारी संघटनांना बोलावून त्यांच्या सूचना समजून घेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे’.

‘देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवतात अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं’

विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा
सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय झाल्यास कोणाची नाराजी राहत नाही. कार्यालयात बसून निर्णय घ्यायचा आणि तो तातडीने राबवायचा हे चुकीचे आहे. जिल्हा प्रशासनाने निर्णयाचा फेरविचार करावा. मी स्वतः पालकमंत्र्यांशी चर्चा करुन व्यापाऱ्यांची बाजू मांडणार असल्याचे शिवेंद्रसिंहराजे shivendraraje bhosale यांनी नमूद केले.

shivendraraje bhosale,lockdown, satara,कोरोना,राज्य शासन,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले,कोरोना व्हायरस,

Read More : 

राज ठाकरेंचं ‘ते’ भाकीत खरं ठरणार?

अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद – मनपा आयुक्त विक्रम कुमार

मुंबई पोलिस काहीच करत नव्हते; देशमुखांच्या राजीनाम्यानंतर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

‘आता किमान समान कार्यक्रम म्हणून तिसऱ्या विकेटसाठी काँग्रेसला संधी हवी, अन्याय होऊ नये’, भाजपचा टोला

उदगीर पंचायत समितीच्या इमारतीसाठी 10 कोटींचा निधी मंजूर – राज्यमंत्री संजय बनसोडे

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

‘सचिन वाझे, परमबीर यांनी जे केलं तेच देशमुखांनी कारावे, शरद पवार, उद्धव ठाकरेंनी वसुली करण्याचे सांगितलं असं थेट सांगावं’

जे समोर आलं ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे, आगे आगे देखो…होता है क्या?’ – भाजप नेते गिरीश महाजन

Related Posts