IMPIMP

शिवसेनेची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले – ‘राज्यातील काही पुढारी जाहीरपणे कोरोनाची थट्टा करताहेत’

by sikandershaikh
shivsena saamana editorial mns raj thackeray mask

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)shivsena | मराठी भाषा दिनानिमित्त (Marathi Language Day) मनसेच्या (Maharashtra Navnirman Sena – MNS) वतीनं मराठी स्वाक्षरी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र कोरोना (COVID-19) च्या वाढत्या प्रादुर्भावामुळं राज्य सरकारनं मनसेच्या कार्यक्रमांना गर्दी नाकारली होती. शिवाजी पार्क येथे मनसेनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मास्क लावला नव्हता. यानंतर राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा झाली. तुम्ही मास्क का लावला नाहीत असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर मी मास्क लावतंच नाही, तुम्हाला सांगतोय असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं. यावरून आता शिवसेनेनं अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाली शिवसेना ?

शिवसेनेनं (shivsena) म्हटलं की, पुन्हा विधीमंडळाचं अधिवेशन चालू देणारन नाही, ही भूमिका पंतप्रधान मोदींना मान्य होईल का ? चर्चेतून मार्ग निघतो. आंदोलन करण्याची गरज नाही असं मोदी वारंवार सांगत आहेत. परंतु महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील भाजप ते ऐकायला तयार नाही. महाराष्ट्रात विरोधकांनी उचलून धरावेत असे अनेक प्रश्न आहेत.

शिवसेना पुढे म्हणते, राज्यात कोरोना संसर्गाचं संकट गंभीर वळणावर पोहोचलं आहे.
नवे रूग्ण आणि बळी वाढू लागले आहेत.
राज्यातील काही पुढारी आपण मास्क वगैरे लावणार नही असं जाहीरपणे सांगत कोरोना संसर्गाची थट्टा करत आहेत.

दरम्यान कोरोना (COVID-19) च्या वाढत्या प्रादुर्भावामुळं राज्य सरकारनं मनसेच्या कार्यक्रमांना गर्दी नाकारली होती.
यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता.
मंत्री गर्दी करून धुडगूस घालतोय आणि शिव जयंती, मराठी भाषा दिनाला सरकार नकार देत आहे.
कोरोनाचं संकट येतंय असं वाटत असेल तर निवडणुकाही पुढं ढकलाव्यात असंही राज ठाकरे म्हणाले होते.

कोरोना वाढत असताना पबमधील पार्ट्यांवरून निलेश राणेंची टीका, म्हणाले – ‘नाईट लाईफच्या नावाखाली पेंग्विन मुंबईची वाटत लावतोय’

Related Posts