IMPIMP

फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘संपूर्ण जग घेतंय ‘सामना’ची दखल’

by pranjalishirish
shivsena-sanajy-raut-bjp-devendra-fadanvis-saamana

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर विधिमंडळात सातत्याने टीका केली जात होती. त्यावरून आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून देवेंद्र फडणवीसांच्या Devendra Fadnavis टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. सामनामधून हे प्रसिद्ध झाल्यानंतर घाव वर्मी बसला असल्याचे फडणवीस म्हणाले. ‘महाराष्ट्र, देशात सत्य काय घडत आहे. त्याची माहिती सामनामधून मिळत असते. संपूर्ण जग सामनाची दखल घेते, असे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.

शिवसेनेच्या ‘सामना’मधून ‘संशयास्पद मृत्यूचा धड तपास होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे विकृत रूप’ लेख प्रसिद्ध झाला. त्यावरून देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली. त्यानंतर याच टीकेवर संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे सामना वाचतात तसेच त्यांनी कबूल केले. सामना वाचणं सुंदर सवय आहे. महाराष्ट्र, देशात सत्य काय घडत आहे. त्याची माहिती सामनामधून मिळत असते. संपूर्ण जग सामनाची दखल घेत आहे. त्यामुळे देवेंद्रजींना चांगली सवय लागली असेल तर मी त्यांचे कौतुक करतो.

टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले…

नागपुरात देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यादरम्यान पत्रकारांनी सामना संपादकीयमधून करण्यात आलेल्या टीकेबद्दल विचारले. त्यामध्ये ते म्हणाले, ‘जनहिताचे मुद्दे उचलणे जशी आमची जबाबदारी आहे. तशी वृत्तपत्रांचीही आहे. आम्ही विजेबद्दल, शेतकरी, कोविडबद्दल बोललो. पण त्यांना जनहिताचे मुद्दे दिसले नाहीत. त्यांना केवळ टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. असा अग्रलेख आल्याने घाव वर्मी बसला आहे हे लक्षात आले आहे’.

Alos Read :

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपूरला जाऊन घेतली सरसंघचालकांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

Related Posts