IMPIMP

सिंधुदुर्ग ZP अध्यक्ष निवडणूक : नारायण राणेंचा शिवसेनेवर गंभीर आरोप, म्हणाले…

by pranjalishirish
Narayan Rane on CM Uddhav Thackeray | how did uddhav thackeray get chief ministers post what happened night narayan ranes big claim

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आज होणाऱ्या निवडणुकीत जिल्हा बँकेच्या काही अधिकाऱ्यांकडून हस्तक्षेप केला जात आहे. बँकेचं कर्ज घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांना संबंधित अधिकारी संपर्क करत आहेत. जप्तीची कारवाई टाळायची असेल तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत (Satish Sawant) यांना येऊन भेटा अशी धमकी दिली जात आहे असा आरोप भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे.

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

नारायण राणेंचा नेमका आरोप काय ?

नारायण राणे  Narayan Rane यांचा आरोप आहे की, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते सतिश सावंत हे भाजपच्या सदस्यांना फोन करून सांगत आहेत की, आम्ही तुमच्यावर जप्ती येऊ देणार नाही. तुम्ही आम्हाला येऊन भेटा. तुम्हाला प्रत्येकी 25 लाख देतो. इतकंच नाही तर जिल्हा बँकेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी लावून जे दोषी आहेत त्यांना सचिन वाझे यांच्यासोबत जेलमध्ये पाठवण्याचा इशारा देखील राणे यांनी दिला आहे.

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

सतीश सावंत यांनी फेटाळले आरोप, म्हणाले- ‘राणेंपासून जिवाला धोका’

या सगळ्यावर भाष्य करत सतिश सावंत यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत आणि राणेंवरच त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. सतिश सावंत म्हणाले, नारायण राणे Narayan Rane  यांचं राजकीय वजन कमी झाल्यानं त्यांना लोकसभेचं अधिवेशन सोडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीवर लक्ष केंद्रीत करावं लागलं आहे. 1990 पासून आतापर्यंत राणेंच्या एका फॅक्सवर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड होत होती. मात्र आज राणे पिता-पुत्रांना जिल्ह्यात ठाण मांडावं लागलं आहे असं ते म्हणाले. इतकंच नाही तर राणेंपासून आपल्या जिवाला धोका आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

GROHE Hurun Report : मंगल प्रभात लोढा देशातील सर्वात ‘श्रीमंत’ बिल्डर, जाणून घ्या त्यांच्यासह इतर मोठया ग्रुपच्या संपत्तीबाबत

‘सदस्य फुटू नयेत म्हणून रुग्ण ठेवतात त्या ठिकाणी त्यांना नजरकैद केलंय’

पुढं बोलताना सावंत म्हणाले, भाजपचे सदस्य फुटू नयेत म्हणून गेले चार दिवस झाले त्यांना आपल्या पडवे येथील रुग्णालयात जिथं रुग्ण ठेवले जातात तिथं नजरकैदेत ठेवण्याची वेळ राणेंवर Narayan Rane  आली आहे.

Aslo Read : 

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

Phone Tapping : मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी मौन का बाळगलंय? संजय राऊतांनी केले स्पष्ट

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले-‘संजय राऊत हे एवढे मोठे नेते नाहीत की मी…’

सबळ पुरावे बंद पाकिटात गृहसचिवांना दिलेत, योग्य कारवाई होईल – फडणवीस

ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवले यांची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल

Related Posts