IMPIMP

सीताराम कुंटेंचा अहवाल मुखमंत्र्यांकडे सादर, रश्मी शुक्ला यांच्याविरोधात सरकारकडून मोठया कारवाईची तयारी?

by pranjalishirish
Rashmi Shukla Phone Tapping Case | IPS rashmi shukla phone tapping case Ministry of Home Affairs opposes Maharashtra governments application

मुंबई : फोनटॅपिंग प्रकरणी राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रश्मी शुक्ला  Rashmi Shukla यांच्या फोन टॅपिंगच्या अहवालावरून चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सीताराम कुंटे यांना या प्रकरणी अहवाल देण्यास सांगितले होते. कुंटे यांनी गुरुवारी हा अहवाल मुख्यमंत्र्याना सादर केला आहे. या अहवालाच्या आधारेच रश्मी शुक्ला यांच्याविरोधात कारवाईची तयारी राज्य सरकार करत आहे.

Deepali Chavan Suicide Case : चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर…

सीताराम कुंटे यांनी दिलेल्या अहवालात रश्मी शुक्ला यांनी काही व्यक्ती सार्वजनिक सुव्यवस्थेस दहशतवादी ‘कृत्ये, दंगली घडविणे यांसारखीकृत्ये करून धोका पोहोचवू शकतात असे सांगून त्यांनी काही खासगी व्यक्तींचे दूरध्वनी टॅप करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्या आधारे त्यांनी काही जणांचे फोन टॅप के ले व त्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा उल्लेख होता, असे म्हंटले आहे. त्याच बरोबर सरकारची दिशाभूल करून गुप्त अहवाल उघड करणे हे अत्यंत गंभीर आहे. हा अहवाल त्यांनीच फोडल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल असे अहवालात नमूद केले आहे.

‘महाविकास आघाडीतील नेते राज्यपालांना भेटणार’, अजित पवारांनी सांगितलं

पोलीस अधिकाऱयांच्या कोरोनाकाळात बदल्या करण्यात आल्या नव्हत्या. पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारसीनुसारच काही अपवाद वगळता २०२० मध्ये भारतीय पोलीस सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. मात्र २७ जून ते १ सप्टेंबर या काळात एकाही पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली नव्हती. शुक्ला यांनी ऑगस्टमध्ये अहवाल दिला त्या काळात एकाही पोलीस अधिकाऱ्याची बदली झाली नव्हती याकडे कुंटे यांनी अहवालात लक्ष वेधले आहे.

तीरथ सिंहांच्या Ripped Jeans च्या विधानावर स्मृती इराणी भडकल्या, म्हणाल्या – ‘नेत्यांचा कायद्याशी संबंध, लोकांच्या कपड्याशी नाही’

सरकारला ज्यावेळी अहवाल सादर करण्यात आला तेव्हा तो पेनड्राईव्ह मध्ये नव्हता. मात्र, शुक्ला Rashmi Shukla यांनी सरकारला सादर केलेला अहवाल पेन ड्राइव्हमध्ये असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्याची प्रत त्यांच्याकडून उघड झाल्याचा संशय येतो. हा गुप्त अहवाल त्यांच्याकडूनच उघड झाल्याचे स्पष्ट होताच त्या कठोर कारवाईस पात्र होतील. असेही या अहवालत म्हंटले आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सरकारची दिशाभूल करणाऱ्या रश्मी शुक्ला यांच्या विरोधात कारवाईची मागणी मुख्यमंत्र्यांकडे के ली आहे. त्यामुळे मुख्य सचिवांच्या अहवालाच्या आधारे शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल के ला जाण्याची शक्यता आहे.

API माधुरी मुंडेसह तिघांवर अ‍ॅन्टी करप्शनची मोठी कारवाई

अहवालात काय ?
रश्मी शुक्ला Rashmi Shukla  यांनी दहशतवादी कृत्ये किंवा दंगली माजविणे यांसारखे कृत्य होऊ नये यासाठी काही व्यक्तीच्या फोन टॅपिंगची परवानगी घेतली होती. मात्र याचा दुरुपयोग केल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांच्याकडून स्पष्टीकरण घेण्यात आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व आपली भेट घेऊन रश्मी शुक्ला यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचे कुंटे यांनी अहवालात म्हंटले आहे. पतीचे कर्क रोगामुळे झालेले निधन, मुलांचे शिक्षण अशी विविध कौटुंबिक कारणे देत कारवाई होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. महिला अधिकारी व पतीचे झालेले निधन यातूनच त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवित शुक्ला यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली नव्हती, असेही कुंटे यांनी अहवालात स्पष्ट केले आहे.

‘देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय, आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा !’

भाजपला पाठिंब्यासाठी शुक्ला यांच्याकडून आमदारांवर दबाव : आव्हाड
फोन टॅपिंग प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला Rashmi Shukla  यांच्याविरोधात आक्रमक झाले आहे. रश्मी शुक्ला यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना भाजपला साथ द्या, असे सांगत त्यांच्यावर दबाव टाकला होता, असा आरोप गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Photos : श्वेता तिवारीनं ‘बोल्ड’ फोटो शेअर करत दाखवले ‘अ‍ॅब्ज’ ! चाहते म्हणाले – ‘वय जराही वाढलं नाहीये’

रश्मी शुक्ला यांनी केलेल्या अवैध फोन टॅपिंगवरून मंत्रिमंडळ बैठकीत तीव्र प्रतिक्रिया उमटली. या गंभीर कृत्याबद्दल शुक्ला यांच्यावर माफी मागितल्यानंतर कारवाई करायला हवी होती. असा सूर उमटला होता. त्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

Sharad Pawar : ही बातमी कायम लक्षात राहील

… तर शुक्लांवर दीड वर्षात कारवाई का केली नाही : मुनगंटीवार
फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला Rashmi Shukla यांचे नाव समोर आल्यानंतर गुरुवारी भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई न करता मुख्यमंत्र्यांनी माफी मागितल्यावर एखाद्या अधिकाऱ्याला सोडून द्यायचे, ही संविधानातील व कायद्यातील कोणती पद्धत राबविली, अशी तरतूद आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली.

‘रश्मी शुक्लांसह पोलीस खात्यातील असे 4 ते 5 अधिकारी शरद पवार आणि आमच्या नजरेत आले होते’

राजेंद्र यड्रावकर यांना भाजपला पाठिंबा देण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी धमकावले असेल किंवा गृह सचिवांची परवानगी न घेता दूरध्वनी टॅप केले असतील, तर त्यांच्यावर सरकारने कायदेशीर कारवाई का केली नाही, असा सवाल करत मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन शुक्ला यांनी माफी मागितली, त्या रडल्या, हा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा दावा मुनगंटीवार यांनी खोडून काढला.

Also Read : 

पोलिस बदली रॅकेटचा गुंता आणखी वाढला; आणखी एक नाव समोर, भाजपनेच दिली माहिती

Udit Raj : ‘राष्ट्रपती दलित, पण पंतप्रधान मोदी नमस्कारही घेत नाहीत; दलितांना BJP मध्ये किंमत नाही

काय असतो डाऊन सिंड्रोम? जाणून घ्या या आजाराची कारणे आणि लक्षणे

Mumbai : भांडुपमधील रुग्णालयाच्या आगीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी ! कारवाईचा इशारा देत म्हणाले…

पुणे पोलिस आयुक्तालयातील 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, लोणीकाळभोर आणि चतुःश्रृंगी ठाण्यांत नवीन पीआयची नियुक्ती

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

‘देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय, आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा !’

Related Posts