IMPIMP

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

by pranjalishirish
this is conspiracy against maha vikas aghadi government says shiv sena

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ‘देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन मोदी-शहांना भेटतात व दोन दिवसांत परमबीर सिंग हे पत्र लिहून खळबळ माजवतात. त्या पत्राचा आधार घेऊन विरोधी पक्ष जो हंगामा करीत आहे, हा एक कटाचाच भाग दिसतो,’ असा आरोप शिवसेनेकडून Shiv Sena  करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांनी केलेल्या ‘त्या’ मागणीला देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर राज्याच्या गृहमंत्र्यावर अनेक आरोप करत त्यांच्या राजीनाम्यची मागणी विरोधकांकडून करण्यात येत होता. त्यातच आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. त्यामुळे आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. या सगळ्या प्रकारणांवरून शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून टीका केली आहे. राज्यातील विरोधी पक्ष आणि केंद्र सरकार यांनी मिळून राज्यातील सरकारविरोधात हा कट रचल्याचा आरोप शिवसेनेकडून Shiv Sena करण्यात आला आहे. या संदर्भात शिवसेनेने घडलेला घटनाक्रमसुद्धा सांगितला आहे.

दिलीप वळसे-पाटील होऊ शकतात नवे गृहमंत्री ! HM अनिल देशमुख यांना दिला जाऊ शकतो ‘निरोप’

‘महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था ठीक नसल्याचा ठपका ठेवायचा व राष्ट्रपती राजवटीचा हातोडा हाणायचा हेच महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे अंतिम ध्येय दिसते व त्यासाठी नवी प्यादी निर्माण करण्यात येत आहे. त्यासाठी परमबीर सिंग यांचा वापर यासाठीच करण्यात येत आहे’ असे शिवसेनेने Shiv Sena म्हटले आहे. ‘विरोधी पक्षाने महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचा अतिरेकी वापर चालवला आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यास हे परवडणारे नाही. एका बाजूला राज्यपाल राजभवनात बसून वेगळेच उपद्व्याप करीत आहेत तर दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबावाचा खेळ करीत आहे. कुठे एखाद्या भागात चार कोंबड्या व दोन कावळे विजेच्या तारांचा शॉक लागून मेले तरी केंद्र सरकार महाराष्ट्रात सीबीआय किंवा एनआयएला पाठवू शकते,’ असा टोला शिवसेनेने विरोधी पक्षाला लगावला आहे.

शरद पवारांचा दिल्लीतून भाजपवर ‘निशाणा’, फडणवीसांनी केला ‘पलटवार’

अग्रलेखातील ठळक मुद्दे:
परमबीर सिंग हे अगदी बेभरवशाचे अधिकारी आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असे भाजपचे कालपर्यंत मत होते. ‘सचिन वाझे यांना हटवून काय फायदा? पोलीस आयुक्तांना हटवा’ अशी मागणी भाजपकडून करण्यात येत होती. आता त्याच परमबीर यांना खांद्यावर घेऊन भाजपवाले लग्नाच्या वरातीत नाचावे तसे बेभान होऊन नाचत आहेत. हा राजकीय विरोधाभास आहे.

शरद पवारांनी ‘लेटर बॉम्ब’च्या ‘त्या’ कनेक्शन कडे वेधले लक्ष, म्हणाले…

सचिन वाझे यांच्यावर मनसुख हिरेन यांच्या खुनाचा आरोप ठेवला आहे. या प्रकरणात एनआयएकडून परमबीर यांना चौकशीला बोलावले जाऊ शकते. यामुळे परमबीर यांनी स्वतःला वाचवण्यासाठी हे आरोप केले आहेत.हे सत्य असेल तर भाजपकडून परमबीर यांचा वापर सरकारच्या बदनामीसाठी करण्यात येत आहे. त्यांना फक्त सरकारला बदनामच करायचे असे नाही, तर सरकारला अडचणीत आणायचे असे त्यांचे धोरण आहे.

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

महाविकास आघाडी सरकारजवळ आजही स्पष्ट बहुमत आहे. जर तुम्ही बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल. हा इशारा नसून वस्तुस्थिती आहे. एखाद्या अधिकाऱ्यामुळे सरकार येत नाही व कोसळत नाही, हे विरोधकांनी विसरू नये!.

Also Read : 

खा. संजय राऊतांचा सरकारला सल्ला, म्हणाले -‘सरकारमधील प्रत्येक घटकानं आत्मपरीक्षण करावं’

‘तलाश नए रास्तों की है…’ खा. संजय राऊतांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

परमबीर सिंहांच्या पत्रामुळं गृहमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव? शरद पवारांनी अजितदादांसह ‘या’ दिग्गज मंत्र्याला बोलावलं दिल्लीत

तपासावरून लक्ष विचलित करण्यासाठी परमबीर सिंग यांचे पत्र – जयंत पाटील

Related Posts