IMPIMP

Twitter ची Congress च्या अनेक नेत्यांवर कारवाई, लॉक केले ऑफिशियल अकाऊंट; जाणून घ्या कारण

by nagesh
twitter suspends congress party official twitter account several leaders account also locked

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Twitter | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यानंतर आता काँग्रेस (Congress) पार्टीचे ऑफिशियल ट्विटर (Twitter) अकाऊंट लॉक करण्यात आले आहे. यापूर्वी काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांची अकाऊंट सुद्धा लॉक करण्यात आली होती, ज्यामध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव अजय माकन, काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला, लोकसभेतील पक्षाचे नेते मणिकम टागोर, आसाम काँग्रेस प्रभारी जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्ष सुष्मिता देव यांच्या ट्विटर अकाऊंटचा समावेश आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Rahul Gandhi यांच्या Tweet वर गोंधळ

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मागील आठवड्यात दिल्ली कँटमध्ये बलात्कार आणि हत्येतील
(Delhi Cantt Rape and Murder) नऊ वर्षांच्या पीडितेच्या कुटुंबियांसोबतची छायाचित्रे ट्विट केली होती. ज्यानंतर राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) च्या तक्रारीवर ट्विटरने राहुल गांधी यांचे कथित वादग्रस्त ट्विट डिलिट केले होते. आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अल्पवयीन पीडितेच्या वैयक्तिकतेचे उल्लंघन करण्याचा आरोप केला होता.

 

 

Twitter ने दिले स्पष्टीकरण

यापूर्वी बुधवारी ट्विटरने दिल्ली हायकोर्ट (Delhi High Court) ला सांगितले होते की, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 4 ऑगस्टला केलेल्या ट्विटने कंपनीच्या धोरणांचे उल्लंघन केले होते. त्यांनी रेप पीडितेच्या आई-वडिलांसोबत आपली छायाचित्रे ट्विट केली होती. या कारणामुळे त्यांचे अकाऊंट अस्थायी प्रकारे बंद केले.

 

 

काँग्रेस पार्टी आणि इतर नेत्यांची अकाऊंट का झाली लॉक

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ट्विटला काँग्रेसच्या इतर नेत्यांनी रिट्विट केले होते आणि शेयर केले होते. यानंतर ट्विटरने काँग्रेस पाटीच्या ऑफिशियल अकाऊंटसह इतर नेत्यांवर अ‍ॅक्शन घेत त्यांची हजारो अकाऊंट लॉक केली आहेत.

 

Web Title : twitter suspends congress party official twitter account several leaders account also locked

 

हे देखील वाचा :

Pune Crime | भाड्याने लावतो असे सांगून परस्पर गाडी विकणाऱ्या दोघांना अटक

Raj Kundra Pornography Case | शर्लिन चोपडाने शेयर केला राज कुंद्रासोबतच्या पहिल्या शूटचा फोटो, म्हणाली – ‘माझ्यासाठी नवा अनुभव होता’

ISRO | इस्रोला मोठा झटका ! EOS-3 सॅटेलाइट लॉन्च; अखेरच्या क्षणी क्रायोजेनिक इंजिनमध्ये बिघाडाने मिशन ‘फेल’

 

Related Posts