IMPIMP

ISRO | इस्रोला मोठा झटका ! EOS-3 सॅटेलाइट लॉन्च; अखेरच्या क्षणी क्रायोजेनिक इंजिनमध्ये बिघाडाने मिशन ‘फेल’

by nagesh
isro launch gslv f10 eos 03 eyes space satish dhawan space centre sriharikota

श्रीहरीकोटासरकारसत्ता ऑनलाइन – ISRO | अंतराळातील भारताचा सीसीटीव्ही असे म्हटले जाणारे व संपूर्ण देशासह सीमांवर नजर ठेवणारे सॅटेलाईट घेऊन जाणार्‍या अग्निबाणाच्या क्रायोजेनिक इंजिनमध्ये शेवटच्या क्षणी बिघाड झाल्याने आज इस्त्रोचे (ISRO) इओएस ३ अर्थ ऑब्झरवेशन सॅटेलाईट (EOS-3) मशीन फेल झाले हा इस्त्रोसहीत भारताला मोठा झटका बसला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

या उपग्रहाचे ठरलेल्या वेळेनुसार सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी यशस्वीपणे उड्डाण झाले. परंतु, पहिले दोन टप्पे पार केल्यानंतर तिसर्‍या टप्प्यात तांत्रिक कारणामुळे ते अयशस्वी झाले.

 

इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन (ISRO President K. Siwan) यांनी ट्विट करुन सुरुवातीला रॉकेटचे यशस्वी उड्डाण झाल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर हे रॉकेट पृथ्वीशी कक्षा ओलांडू शकले नाही. अंतराळातच त्याचा स्फोट होऊन ते नष्ट झाले. त्यानंतर इस्त्रोचे अध्यक्ष के सिवन म्हणाले की, क्रायोजेनिक स्टेजमध्ये तांत्रिक विसंगती दिसून आली आणि मिशन पूर्ण होऊ शकले नाही.

 

 

अर्थ ऑब्झरवेशन सॅटेलाईट ३ चे जियोसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हीकल एफ १० द्वारे लाँच करण्यात
आले. हे रॉकेट ५२ मीटर उंच आणि ४१४.७५ टन वजनाचे होते. त्यात तीन स्टेज होते. या रॉकेटची
२५०० किलोग्रामपर्यंतचे सॅटेलाईट अंतराळात पोहचविण्याची क्षमता होती. इओएस -३ सॅटेलाईटचे
वजन २२६८ किलोग्राम होते. अंतराळात गेल्यानंतर हा ३६ हजार किलोमीटरवर स्थिर होणार होता. इस्त्रोने आतापर्यंत ३६ हजार किलोमीटरवर कोणताही उपग्रह सोडला नव्हता.

 

हे सॅटेलाईट दिवसभर दर अर्धा तासाने संपूर्ण भारताची छायाचित्रे घेणार होता. त्याच्या गरजेनुसार
वैज्ञानिक ही छायाचित्रे अन्य मंत्रालयांना देऊन त्यांच्या कामासाठी ते उपयोग करु शकले असते.

 

Web Title : isro launch gslv f10 eos 03 eyes space satish dhawan space centre sriharikota

 

हे देखील वाचा :

Pune News | पुण्यातील विद्यार्थ्यांनी तयार केली भारतातील पहिली चालकरहित इलेक्ट्रिक कार

Beed Crime | चक्क सासू-सासऱ्याने सुनेला भावाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास पाडलं भाग; बीडमधील संतापजनक घटना

Anti Corruption Nashik | 8 लाखाच्या लाच प्रकरणात ZP च्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर फरार?

 

Related Posts