IMPIMP

कोरोनाच्या संकट काळात राजकारण थांबवा ! ‘याची विकेट जाईल, त्याची विकेट जाईल बंद करा’

by pranjalishirish
uddhav thackeray s government in maharashtra will not fall easily said minister nitin raut

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन : राज्यातील विविध प्रकरणांवरून सत्ताधारी उद्धव ठाकरे Uddhav Thackeray  यांच्या सरकारवर निशाणा साधला जात आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जात आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेशात सरकार पाडले तसे महाराष्ट्राचे सरकार इतक्या सहजासहजी पडणार नाही. महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात हे सरकार काम करत राहील, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सोनिया गांधींना सांगितल्याचे समजते.

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

संजय राठोड यांचा राजीनामा, त्यानंतर अनिल देशमुख यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. या सर्व घडामोडीनंतर ठाकरे सरकार Uddhav Thackeray  पडणार असल्याचा दावा अनेकदा भाजपकडून केला जात होता. मात्र, त्यावर नितीन राऊत यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी सांगितले, ‘मध्यप्रदेशात सरकार पाडले तसे महाराष्ट्राचे सरकार इतक्या सहजा-सहजी पडणार नाही. महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Thackeray  यांच्या नेतृत्वात हे सरकार काम करत राहील. कोरोनात राजकारण आणून याची विकेट जाईल त्याची विकेट जाईल हे बंद करा.’

ठाणे महापालिकेचा आरोग्य अधिकारी 5 लाखाची लाच घेताना ACB च्या जाळ्यात

तसेच अनिल देशमुख प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, अनिल देशमुखांचे प्रकरण आता न्यायालयात आहे, तेव्हा त्यांना त्यांचे काम करू द्यावे. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कोणी वसूली मंत्री होत नाही. तसेच केंद्राने त्यांच्या नेत्यांवर विश्वास ठेवावा. कोरोनाचा विषय कोणत्याही पक्षाचा नाही. हा सध्या महाराष्ट्राचा प्रश्न झाला आहे. तसेच लसीवरुन राजकारण थांबवा. सध्या सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

Read More : 

गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !

जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

Pimpri : ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल अन् डॉ. डी.वाय हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

Related Posts