IMPIMP

‘मी स्वत:च चौकशीची मागणी करतो, कौर प्रकरणात शिवसेनेच्या खासदाराची लोकसभेत मागणी’ (व्हिडीओ)

by pranjalishirish
video i myself demand inquiry arvind sawant passionate lok sabha

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- सचिन वाझे प्रकरणी संसदेत आवाज उठवल्यामुळे अरविंद सावंत यांनी मला धमकी दिल्याची तक्रार अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्राद्वारे केली. त्यावर आता खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत उत्तर दिले आहे. तसेच या प्रकणाची चौकशीची मागणी केली आहे. यापूर्वी अरविंद सावंत arvind sawant यांनी नवनीत राणा Navneet Rana  यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

Jitendra Awhad : ‘रश्मी शुक्लांचे अपक्ष आमदारांना भाजपच्या गळाला लावण्याचे प्रयत्न’

लोकसभेत नवनीत राणा Navneet Rana  प्रकरणावर उत्तर देताना अरविंद सावंत  arvind sawant म्हणाले, माझ्या आयुष्यातील पन्नास वर्षे मी सार्वजनिक क्षेत्रात घालवली आहेत, त्यामधली 25 वर्षे संसदीय क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे संसदीय क्षेत्राची मर्यादा, भाषेची मर्यादा याचे नेहमीच पालन करत आलो आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आपल्यासमोर उभा आहे. माझ्या आयुष्यात मी कधीच कुणाला अपमानित केले नाही. कुणासाठी अपमानित शब्दांचा प्रयोग केलेला नाही. त्यामुळे, आता मीच चौकशीची मागणी करत आहे, असे अरविंद सावंत यांनी संसदेत बोलताना सांगितले.

बदल्यांचे रॅकेट, फोन टॅपिंगवर अजित पवार म्हणाले, ‘त्या बदल्या…’

अरविंद सावंत  arvind sawant पुढे म्हणाले, जे पत्र अध्यक्ष महोदयांना लिहिण्यात आले आहे. ते पत्र सोशल मीडियात गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल  होत आहे. त्यामुळे मी देशात बदनाम झालोय, विशेष म्हणजे महिलांचा अपमान केल्यामुळे. त्यामुळे आपण सीसीटीव्ही तपासावेत, त्या पत्रात जे लिहले आहे ते बोलण्यासाठी मला त्याठिकाणी थांबावे लागले असेल, ते देखील तपासून पहावे. आपण माझा इतिहास तपासा आणि ज्यांनी आरोप केलेत त्यांचाही इतिहास तपासा. मी आयुष्यात कोणालाही अपमानीत केले नाही, असे म्हणत अरविंद सावंत यांनी आपली बाजू सभागृहात मांडली.

PM नरेंद्र मोदींच्या बांग्लादेशी दौर्‍यावर पाकिस्तानचा सवाल, बांग्लादेश वासियांनी दिले त्यांना चोख प्रत्युत्तर

आरोपानंतर काय म्हणाले अरविंद सावंत ?

मी आजवर कधी कोणाला धमकी दिलेली नाही. महिलेला धमकावण्याचा तर प्रश्नच येत नाही. मी शिवसैनिक आहे. माझ्याकडून असं कधीच होणार नाही. नवनीत राणा Navneet Rana जेव्हा कधी मला संसदेत भेटतात, तेव्हा दादा, भैय्या म्हणून हाक मारतात. मी देखील अनेकदा त्यांच्याशी बोलत असतो.काही गोष्टींच्या बाबतीत त्यांना समजावत असतो. पण धमकी वगैरे देण्याचा प्रश्नच येत नाही. उलट त्याच लोकांना धमक्या देत असतात. त्यांना राईचा पर्वत करण्याची सवय आहे.

Also Read : 

BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

चंद्रकांत पाटलांनी केलं ReTweet ! म्हणाले – ‘अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतलं गेलं अन्…’

मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा

M नरेंद्र मोदींच्या बांग्लादेशी दौर्‍यावर पाकिस्तानचा सवाल, बांग्लादेश वासियांनी दिले त्यांना चोख प्रत्युत्तर

Ramdas Athawale : ‘ठाकरे सरकार कलंकित, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही’

संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीत ? काँग्रेसचा संतप्त सवाल

Ration Card Latest News : रेशन घेण्याबाबत जर तुम्ही सुद्धा करत असाल ‘अशी’ चूक तर व्हा सावध, होऊ शकते 5 वर्षांची जेल

‘केरळचे लोक सुशिक्षित असल्याने भाजपला मतं मिळत नाही’, भाजप नेत्याचे वक्तव्य

Related Posts