IMPIMP

पश्चिम बंगालमध्ये 294 पैकी 300 जागांवर भाजपचा विजय होईल, यशवंत सिन्हां ची उपरोधिक टीका

by pranjalishirish
west bengal election 2021 yashwant sinha says my information bjp be win total 300 seats out 294

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. त्यानंतर आता नुकतेच भाजपला रामराम ठोकत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा Yashwant Sinha  यांनी भाजपवर उपरोधिक टीका केली. ‘पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला 294 पैकी 300 जागांवर विजय मिळेल’, असे ते म्हणाले.

‘मुलींनो, राहुल गांधीपासून सांभाळून राहा, त्यांच्यासमोर वाकून उभे राहू नका’; माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर बंगालमध्ये भाजप 200 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा दावा केला होता. त्यावरूनच यशवंत सिन्हा Yashwant Sinha  यांनी त्यांच्यावर टीका करत हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ‘बंगाल निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपने 30 पैकी 26 जागांवर विजय मिळवणार असल्याचा दावा केला आहे. त्यावर आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभारी आहोत. पण माझ्या माहितीप्रमाणे भाजप संपूर्ण 30 आणि 294 पैकी 300 जागांवर विजय मिळवेल’.

शरद पवार पंढरपुरात प्रचारासाठी येणार का? जयंत पाटील म्हणाले…

दरम्यान, भाजपचे खासदार सुब्रमण्यम् स्वामी यांनीही भाजपला ‘घरचा आहेर’ देत टीका केली होती. त्यामध्ये ते म्हणाले होते, की ‘पाकव्याप्त काश्मीरवर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र करणे हे आता विसरून गेले पाहिजे’. त्यानंतर एकेकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते अशी ओळख असलेल्या यशवंत सिन्हा यांनी भाजपला आता लक्ष्य केले आहे.

Also Read:

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

सचिन, पठाण बंधू यांच्यानंतर भारतीय टीमच्या ‘या’ कर्णधाराला कोरोनाची लागण

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

‘कोरोनाच्या सेकंड म्युटंटप्रमाणेच गुन्हेगारीचं रूपही बदलतंय’ : CM उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांबाबत केलं महत्वपूर्ण विधान; म्हणाले, ‘…भानावर राहावेच लागेल’

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Sachin Vaze : ‘काल पर्यंत सचिन वाझे प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी म्हणणाऱ्या संजय राऊतांचा यू-टर्न, NIA ने चौकशी करावी’

बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले – ‘कदाचित राजकारणी आणि संपादक यात त्यांची गल्लत होते…’

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

Related Posts