IMPIMP

ममता बॅनर्जींचा ‘गौप्यस्फोट’; म्हणाल्या – ‘हो, मी भाजप नेत्याला फोन केला होता’

by pranjalishirish
west bengal election mamata banerjee says did call bjp leader in nandigram

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. टीएमसीच्या एका माजी नेत्याला ज्यानं भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्याला मी फोन केलो होता असं त्यांनी सांगितलं आहे. फोन करणं कुठलाही गुन्हा नाही. दोषी त्यांना ठरवलं पाहिजे. ज्यांनी विश्वासघात केला आणि बातचित लीक केली असंही त्यांनी सांगितलं. भाजपमध्ये गेलेल्या प्रलय पाल (Pralay Pal) यांना ममतांनी फोन केला होता. याचा एक ऑडिओ व्हायरल देखील झाला होता. आधी तर टीएमसीनं या फोनचा दावा फेटाळून लावला होता. परंतु आता खुद्द ममता बॅनर्जींनी फोन केल्याचं सांगितलं आहे.

लवकरच PM मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील, ‘या’ भाजप खासदाराचा पंतप्रधानांना टोला

‘हो, मी नंदीग्राममधील एका भाजप नेत्याला फोन केला होता’

निवडणूक प्रचार संपल्यानंतर बोलताना ममता बॅनर्जी Mamata Banerjee म्हणाल्या, हो, मी नंदीग्राममधील एका भाजप नेत्याला फोन केला होता कुणाला तरी माझ्याशी बोलायचं आहे असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळं त्यांचा नंबर घेऊन मी फोन केला होता. तुम्ही तिथं व्यवस्थित रहा आणि आपल्या प्रकृतीची काळजी घ्या असं मी त्यांना म्हणाले होते. हा काय माझा गुन्हा आहे का ? असा सवालही त्यांनी यावेळी बोलताना केला.

बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रण आम्हालाही नाही पण आम्ही Online पाहणार – अनिल परब

‘मतदारसंघातील उमेदवार असल्याच्या नात्यानं मी कुठल्याही मतदाराची मदत घेऊ शकते’

पुढं बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, मतदारसंघातील उमेदवार असल्याच्या नात्यानं मी कुठल्याही मतदाराची मदत घेऊ शकते. मी कुणालाही फोन करू शकते. यात वाईट काय आहे. हा कुठला गुन्हा नाही. पण जर कुणी बातचित लीक करत असेल तर तो गुन्हा आहे. हा गुन्हा माझ्याविरोधात नाही तर त्या व्यक्तिविरोधात आहे ज्यानं माझी बातचित लीक केली असंही त्यांनी सांगितलं.

‘बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार राज ठाकरे; भूमिपूजन कोण करतंय महत्त्वाचं नाही” ‘या’ नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

‘मी आता सर्वकाही सांभाळून घेईन’

शनिवारी ममता बॅनर्जी यांचा हा ऑडिओ लीक झाला होता. यात ममता दीदी बोलत असल्याचं ऐकायला मिळत आहे. त्यात म्हणत आहेत की, नंदीग्राममध्ये तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे. मान्य आहे, तुमच्या काही तक्रारी आहेत. पण या सर्वांना सुवेंदू अधिकारी कारणीभूत आहेत. त्यांनी मला कधी नंदीग्राम किंवा पूर्व मिदनापूरमध्ये येऊच दिलं नाही. मी आता सर्वकाही सांभाळून घेईन असं त्या सांगत आहेत.

भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका; म्हणाले – ‘सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची नावं’

पाल यांनी टीएमसीमध्ये परत येण्याची ममतांची ऑफर फेटाळल्याचं माध्यमांना सांगितलं

यावर पाल ममतांना म्हणतात, दीदी, तुम्ही मला फोन केला. बरं वाटलं. पण मी सुवेंदू अधिकारींना धोका देणार नाही. कारण ते माझ्यासोबत कायम उभे राहिले आहेत असंही ते सांगतात. यानंतर पाल यांनी टीएमसीमध्ये परत येण्याची ममतांची ऑफर फेटाळल्याचं माध्यमांना सांगितलं.

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

‘ममता आपल्या पदाचा दुरुपयोग करून निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करताहेत’

भाजपचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  Mamata Banerjee या आपल्या पदाचा दुरुपयोग करून निवडणुकीवर आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला. भाजप नेत्यांनी आपल्याकडील ऑडिओ क्लीपही आयोगाला सोपवली आहे.

Also Read:

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

 

Related Posts