IMPIMP

‘NIA ने उरी, पठाणकोट अन् पुलवामा हल्ल्यात काय तपास केला?’ संजय राऊतांची टीका

by pranjalishirish
shivsena leader and mp sanjay raut criticize bjp over its comment on shivsena regarding jalgaon election

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – उद्योगपती मुकेश अंबानी Mukesh Ambani यांच्या घराबाहेर जिलेटीन कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. काही दिवसांनी ज्यांची कार होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढल्यामुळे या प्रकरणाने एक वेगळेच वळण घेतले. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी भाजपने सरकारला आणि गृहमंत्र्यांना धारेवर धरले. तर दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. परमबीर सिंग त्यांच्या बदलीमुळे नाराज आहेत म्हणून ते पदभार न घेताच रजेवर गेले आहेत. तर मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएने आपल्या ताब्यात घेतला आहे. त्यावरून शिवसेनेने एनआयएला NIA अनेक सवाल विचारले तसेच मुंबई पोलिसांच खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपसुद्धा शिवसेनेकडून करण्यात आला आहे.शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून एनआयए आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखात भाजपा नेत्यांना मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं जरा जास्तच दु:ख झाल्याचं म्हंटले आहे.

‘रामायण’मधील ‘राम’ अरुण गोविल यांचा भाजपमध्ये प्रवेश

काय लिहिले आहे अग्रलेखात
‘मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असतानाच ‘एनआयए’ने घाईगडबडीत अँटिलिया स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास हाती घेतला. महाराष्ट्र सरकारला कुठे बदनाम करता आले तर पाहावे यापेक्षा वेगळा ‘उदात्त’ हेतू त्यामागे नसावा. गुन्हे शाखेतील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या भोवतीच हे प्रकरण फिरत आहे व त्यामागचा हेतू लवकरच समोर येईल. कोणत्याही परिस्थितीत यामागे दहशतवादाच्या तारा जुळलेल्या नसताना या गुन्ह्याच्या तपासासाठी ‘एनआयए’ने घुसावे हा काय प्रकार आहे? मुंबईतील वीस जिलेटिन कांड्या हा ‘एनआयए’साठी मोठाच आव्हानाचा विषय ठरताना दिसत आहे,’ असा टोलासुद्धा शिवसेनेने लगावला आहे. एनआयएनकडून NIA दहशतवादासंदर्भातील घटनांचा तपास करण्यात येतो. पण या जिलेटीनच्या कांड्यांचा तपास करणाऱ्या एनआयएने उरी हल्ला, पठाणकोट हल्ला आणि पुलवामा हल्ल्यात काय तपास केला, कोणते संशोधन केले, किती गुन्हेगारांना अटक केली? हेदेखील एक रहस्य आहे असेदेखील शिवसेने सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे.

पंकजा मुंडे यांना धक्का ! माजी आमदाराची राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी, काही मिनिटांचं भाषणही दिलं

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सचिन वाझे यांच्या मागचा सूत्रधार शोधण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपाससुद्धा एनआयएने करावा अशी मागणीसुद्धा फडणवीसांकडून करण्यात आली आहे. शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांच्या या मागणीचा समाचार घेतला आहे. तसेच, ‘एनआयए’च्या NIA भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

खासदार श्रीनिवास पाटील यांची संरक्षणमंत्र्याकडे मागणी, म्हणाले – ‘सैन्यभरतीची वयोमर्यादा त्वरीत वाढवा’

परमबीरसिंग नाराज
परमबीरसिंग यांच्याकडून अचानक पदभार काढून घेण्यात आल्याने ते नाराज आहेत त्यामुळे ते स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे. परमबीरसिंग हे गेल्या १३ महिन्यांपासून मुंबई आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत होते. अंबानी Mukesh Ambani यांच्या निवासस्थानाजळव सापडलेली स्फोटक कार, त्यानंतर मनसुख हिरेन यांचे कथित आत्महत्याप्रकरण यावरुन उठलेल्या गदारोळामुळे परमबीर सिंग अडचणीत सापडले होते. त्यांची आयुक्तपदावरुन बदली केल्यामुळे याप्रकरणी त्यांची चौकशीही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळेच त्यांची अचानक तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे समजत आहे.

Also read : 

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

आघाडी सरकारच्या कारभाराची ‘लिटमस टेस्ट’ पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत होणार !

नाराज असलेल्या वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडेंच्या ‘लेटर बॉम्ब’मध्ये परमबीर सिंह, माजी DGP जयस्वाल यांच्यावर आरोप; पोलीस दलात खळबळ, मुख्यमंत्री ठाकरेंना लिहीलं होतं पत्र

Gulabrao Patil : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ‘कोरोना’ पाँझिटिव्ह

रितिकाच्या आत्महत्येवर गीता फोगाट म्हणाली, ‘जिंकणं-हारणं हा तर खेळाडूच्या आयुष्याचा भाग’

IPL 2021 : ‘मुंबई इंडियन्स’ला मोठा फटका, पाकिस्तानमुळं वाढलं टेन्शन ! जाणून घ्या नेमकं प्रक

राष्ट्रवादीने केले CM उद्धव ठाकरेंचे समर्थन, म्हणाले – ‘वाझेंना सेवेत घेण्यासाठी फडणवीसांवर कोणाचाही दबाव नव्हता’

मुंबईत Lockdown होणार की नाही? पालकमंत्र्यांनी दिले ‘हे’ संकेत

Related Posts