IMPIMP

राज्याला तारण्यासाठी अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा होणार ?

by bali123
budget

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार आज आपला दुसरा अर्थसंकल्प (budget) सादर करणार आहे. खालावलेल्या आर्थिक स्थितीतून राज्याला तारण्यासाठी बजेटमध्ये (budget) काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

कोरोना महामारीमुळे तसेच लॉकडाऊनमुळे राज्याच्या महसुलात प्रचंड घट झाली आहे. राज्यावरील कर्जाचा भार वाढला असून महसुली तूटही वाढली आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. यामुळे यावेळच्या अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा नसतील हे स्पष्ट आहे.

आज दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला जाणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत अर्थसंकल्प सादर करतील. दुसरीकडे, अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

बजेटच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाची काल बैठक झाली होती.
यात प्रामुख्याने अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत मंत्रिमंडळाने बजेटला मंजुरी दिली.
दरम्यान, राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत खालावल्याचे नुकत्याच झालेल्या आर्थिक पाहणी अहवालातून उघड झाले आहे.

कोरोना महामारीमुळे तसेच लॉकडाऊनमुळे राज्याच्या महसुलात प्रचंड घट झाली आहे.
राज्यावरील कर्जाचा भार वाढला असून महसुली तूटही वाढली आहे.
दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
यामुळे यावेळच्या अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा नसतील हे स्पष्ट आहे.

Related Posts