IMPIMP

राज्यात Lockdown लागणार की नाही? राजेश टोपेंनी सांगितला सरकारचा ‘विचार’

by Team Deccan Express
will lockdown be imposed maharashtra health minister rajesh tope says thackeray governments

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने याचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात सध्या लॉकडाऊनची चर्चा सुरु आहे. यातच राज्यात लॉकडाऊनची स्थिती निश्चितपणे निर्माण झाली आहे. मात्र, सध्या लॉकडाऊन करण्याचा राज्य सरकारचा इरादा नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे rajesh tope यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

राज्यात सध्या लॉकडाऊनची स्थिती नाही
राजेश टोपे rajesh tope यांनी लॉकडाऊन संदर्भात माहिती देताना सांगितले कि,व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन, आयसीयू बेड इत्यादी कमी पडू लागतात, तेव्हा लॉकडाऊनची आवश्यकता पडत असते. अशात तीन आठवड्यांचा लॉकडाऊन करुन संक्रमणाची साखळी तोडली जाऊ शकते. परंतु सध्या तशी परिस्थिती नाही. नाईट कर्फ्यू आणि विकेंड लॉकडाऊनने या परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असे सांगत त्यांनी सध्यातरी लॉकडाऊनची आवश्यकता नसल्याचे संकेत दिले आहेत.

लोकांना लस देणे अशक्य होत आहे
राज्यात लसींच्या कमतरतेबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले, देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झाले आहे. महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग सर्वाधिक आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला 1 कोटी 60 लाख लसींची गरज असताना केवळ 1 कोटी 04 लाख लसींचा पुरवठा केला गेला आहे. सध्या राज्यामध्ये 120 सेंटर्स असून त्यापैकी 70 सेंटर्स लस नसल्याने बंद आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण केंद्र वाढवण्यात आले आहेत. अनेक सुविधा असूनही लोकांना लस देणे अशक्य होत असल्याचे टोपे rajesh tope यांनी सांगितले.

कोरोनाच्या सर्वाधिक केस महाराष्ट्रात
केंद्र सरकारकडून सर्वाधिक लसी महाराष्ट्राला दिल्या असल्याचे सांगितले जात आहे. मात्र असे असतानाही लसींच्या कमतरतेची तक्रार आली आहे. यावर बोलताना टोपे यांनी सांगितले की, महाराष्ट्राची तुलना ही राजस्थान किंवा गुजरात या राज्यांसोबत केली जाऊ शकत नाही. लोकसंख्या किंवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राची तुलना लहान राज्यांसोबत होऊ शकत नाही. कारण महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक केसेस आहेत. मात्र, ज्यावेळी देशातील एकूण रुग्णांच्या संख्येपैकी 60 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत, तर महाराष्ट्राला सर्वाधिक लस मिळणे आवश्यक आहे.

डिमांड ड्राइव्ह पुरवठा होत नाही
राजेश टोपे यांनी यावेळी सध्याची आकडेवारी देताना सांगितले की, गुजरातला 16 लाख, हरियाणा 24 लाख, उत्तर प्रेदश 45 लाख, कर्नाटक 29 लाख तर महाराष्ट्राला 17 लाख लसी दिल्या जात आहेत. तसेच केंद्र सरकारने मुबलक मदत केली आहे, मात्र, डिमांड ड्राइव्ह पुरवठा होत नाही. राज्यात 1 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे लसींची मागणी अधिक आहे, असेही टोपे म्हणाले.

Read More : 

सचिन वाझे प्रकरणावरुनही उदयनराजे आक्रमक, म्हणाले, ‘हा कोण वाझे…’

 

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

Balasaheb Thorat : ‘राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्व देत नाही’

राज्यात 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण Lockdown ? मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर
होऊ शकतो निर्णय

खा. विनायक राऊतांचा राणेंवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘कोकण सम्राटां’ नी चिपी विमानतळाचं कंत्राट दळभद्री कंपनीला देऊन वाट लावली

Related Posts