IMPIMP

Yuvasena President | आदित्य ठाकरे युवासेना पदावरून पायउतार होणार?; ‘या’ खास शिलेदाराकडे जाणार युवासेनेची जबाबदारी

by nagesh
Yuvasena President | uddhav thackeray might appoint varun sardesai yuva sena chief

मुंबई (Mumbai): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Yuvasena President | शिवसेना पक्ष (Shiv Sena party) स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतलेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे कायम आपल्या पक्षाची मोट बांधण्यात आणि पक्ष संघटीत राहण्यास आग्रही होते. मात्र त्यांनी आपल्या स्वतःकडे कधी कोणतं सरकारी पद वैगेरे घेतलं नाही. पक्षाची धुरा सांभाळणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या सहित ठाकरे कुटूंबियातील कोणीही सदस्य राजकरणात अथवा पद घेण्यापासून दूर होते. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर एक वेगळं वळण लागलं. अर्थात बाळासाहेब ठाकरे नंतर शिवसेना पक्षाची घडी वेगळीकडे अंथरली गेली. आणि उद्धव आणि आदित्य हे राजकरणात उतरले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

युती तोडून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) स्थापन केले. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे विराजमान झाले. तसेच, पर्यावरण मंत्रीपदी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची वर्णी लागली. यापूर्वी आदित्य यांच्याकडे युवासेनेचीदेखील (Yuvasena President) जबाबदारी आहे. मात्र, त्यांच्याकडे राज्यातील महत्वाचं पद असल्याने युवासेनेसाठी वेळ देता येत नाही. या पार्श्वभूमीवर ही जागा आदित्य ठाकरे सोडू शकतात. यांनतर या पदी विराजमान कोणी होईल? याची चर्चा सुरु असतानाच वरून सरदेसाई यांचं नाव चर्चेत आलं आहे.

 

 

आतापर्यंत कधीही कोणतीही निवडणूक न लढलेल्या उद्धव ठाकरेंकडे थेट मुख्यमंत्रिपदाची सूत्रं आहेत. त्यानंतर आता पक्षामध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. पर्यावरण आणि पर्यटनमंत्री असलेल्या आदित्य ठाकरेंकडे युवासेनेचीदेखील जबाबदारी आहे. युवासेनेत अनेक वर्षे काम केलेले वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्याकडे आता युवासेनेची सूत्रे सांभाळण्याची जबादारी दिली जाऊ शकते. वरुण हे आदित्य यांचे मावसभाऊ आहेत. युवासेनेचे सचिव म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. दरम्यान, येत्या काळात 2021 ला मुंबई पालिकेची निवडणूक आहे. ही निवडणूक शिवसेनेसाठी अंत्यंत महत्वाची बाब असणार आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

तर, वरुण सरदेसाईंकडे (Varun Sardesai) युवासेनेचं प्रमुखपद (Yuvasena President) गेल्यास ही घटना महत्त्वाची आहे.
कारण युवासेनेचं प्रमुखपद आतापर्यंत कधीही ठाकरे कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीला देण्यात आलेलं नाही.
म्हणून, उद्धव ठाकरेंच्या या निर्णयामुळे एक अनोखा निर्णय होणार आहे.
या निर्णयामुळे ठाकरे कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीला हे पद मिळणार आहे.
तर, सध्या सरदेसाई विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.
ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे युवासेनेची जबाबदारी त्यांच्याकडेच सोपवली जाण्याची शक्यता जास्तच दिसून येत आहे.
युवासेना प्रमुखपद प्रथमच ठाकरे कुटुंबाबाहेर जाईल.
परंतु, सरदेसाई हे ठाकरे कुटुंबाच्या अतिशय निकटवर्तीय आहेत.
त्याचबरोबर आदित्य यांचे ते विश्वासू आणि सहकारी म्हणून देखील ओळखले जातात.
वरुण यांच्याकडे संधी आल्यास सर्वत्र आणि सेना पक्षात एक चर्चा निर्माण होऊन एक मेसेज जाऊ शकतो.

 

 

Web Title :- Yuvasena President | uddhav thackeray might appoint varun sardesai yuva sena chief

 

हे देखील वाचा :

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! शुक्रवारी ‘या’ वेळेला 3 तासासाठी बंद राहिल बँकेची ‘ही’ सर्व्हिस, चेक करा टायमिंग

Pimpri Crime | वाहनचोर जोमात, पिंपरी-चिंचवड शहरातून 6 दुचाकी चोरीस

Pornography | युपी सचिवालयातील सचिवाचा पॉर्न व्हिडीओ व्हायरल, कॅमेऱ्यात झाला कैद

 

Related Posts