IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 20 हजाराची लाच मागणाऱ्या कोतवालावर पुणे एसीबीकडून FIR

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Anti Corruption Bureau (ACB) Pune | जागेची 7/12 उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी 20 हजार रुपये लाच मागणाऱ्या (Demanding Bribe) हवेली तालुक्यातील वकडी तलाठी कार्यालयातील कोतवाल नामदेव बाबुराव शिंदे Kotwal Namdev Baburao Shinde (वय – 48) याच्याविरुद्ध पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. नामदेव शिंदे याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.18) गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी 46 वर्षाच्या तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तक्रार दिली होती.
पुणे एसीबीने (Pune ACB) 27 आणि 28 जून रोजी पडताळणी केली असता आरोपी नामदेव शिंदे याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार सोमवारी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.

 

तक्रारदार यांच्या मित्राची हवेली तालुक्यातील वडकी येथे चार गुंठे जागा आहे.
या जागेची 7/12 उताऱ्यावर नोंद करण्यासाठी व पुढील कार्यवाहीसाठी सर्कल कार्यालयात पाठवण्यासाठी वडकी तलाठी कार्यालयातील कोतवाल नामदेव शिंदे याने स्वत:साठी व तलाठी यांच्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपये लाच मागितली.
तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.
पडताळणीमध्ये लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने कोतवाल शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.
पुढील तपास पोलीस उप अधीक्षक सीमा आडनाईक (Deputy Superintendent of Police Seema Adnaik) करीत आहेत.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | Pune ACB Registered FIR Against Kotwal In 20 Thousands Bribe Case

 

 

हे देखील वाचा :

Pune Crime | महिलेचा खून करुन दागिने, रोख रक्कम चोरणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक, 5.38 लाखाचा मुद्देमाल जप्त

Shivsena | उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! 14 खासदार शिंदे गटाच्या बैठकीला हजर

Congress On GST | मोदीजी, किमान जनतेच्या श्वासावर तरी GST लावू नका – मोहन जोशी

 

Related Posts