IMPIMP

Shivsena | उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! 14 खासदार शिंदे गटाच्या बैठकीला हजर

by nagesh
 Shivsena | shiv sena big shock to uddhav thackeray 14 mps attend eknath shinde group online meeting

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिंदे – फडणवीस सरकार (Shinde – Fadnavis Government) स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला (Shivsena) मोठी गळती लागली आहे. आता तर खासदार (MP) सुद्धा शिंदे गटाच्या (Shinde Group) गळाला लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटातील आमदारांची बैठक सुरु असताना शिवसेनेचे (Shivsena) 14 खासदार हे ऑनलाईन बैठकीला हजर असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी शिवसेनेतील 40 आमदारांनी, तसेच विविध मनपा आणि नगरपालिकांमधील आजीमाजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

 

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांच्या गटाने काही महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आज बैठक बोलावली आहे.
या बैठकीला शिवसेनेच्या लोकसभेतील 19 पैकी 14 खासदारांनी हजेरी लावल्याचे वृत्त समोर आले आहे.
शिवसेनेचे 14 खासदार शिंदे गटाच्या बैठकीला ऑनलाईन पद्धतीने हजर राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election)
द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा द्यावा, असा आग्रह केला होता.
त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party Chief Uddhav Thackeray) यांनी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता.
दरम्यान, खासदारांची नाराजी थोपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
मात्र, आता शिवसेनेच्या 14 खासदारांनी थेट शिंदे गटाच्या बैठकीला हजेरी लावल्याने उद्धव ठाकरे यांना अजून मोठा धक्का बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

 

Web Title :- Shivsena | shiv sena big shock to uddhav thackeray 14 mps attend eknath shinde group online meeting

 

हे देखील वाचा :

Congress On GST | मोदीजी, किमान जनतेच्या श्वासावर तरी GST लावू नका – मोहन जोशी

Ramdas Kadam | गेल्या 3 वर्षापासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतोय, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; दिला ‘शिवसेना नेते’ पदाचा राजीनामा

Pune Crime | सराईत गुन्हेगार गणेश चौधरी व अजय विश्वकर्मा पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार

 

Related Posts