IMPIMP

Pune Crime | महिलेचा खून करुन दागिने, रोख रक्कम चोरणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक, 5.38 लाखाचा मुद्देमाल जप्त

by nagesh
 Pune Crime | Bharti Vidyapeeth police arrests man who stole jewelery and cash after murdering woman seized 5.38 lakh worth of valuables

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेचा खून (Murder In Pune) करुन तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने (Gold Jewellery), रोख रक्कम (Cash) तसेच घरातील पेटीतील दागिने चोरुन पसार झालेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी (Pune Police) आरोपीला उत्तर प्रदेशातील प्रयागराज (Prayagraj) येथून अटक (Arrest) केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त (Pune Crime) करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

बादल उर्फ सुग्गा बनवारी बिंद Badal alias Sugga Banwari Bind (वय – 27 रा. ग्राम दुबावल, जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश – Uttar Pradesh) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पारुबाई किसन सावंत Parubai Kisan Sawant (वय – 65 रा. भिलारेवाडी, कात्रज) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत मृत महिलेचा भाऊ शहाजी मारुती चंदनशिवे (Shahaji Maruti Chandanshive) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयपीसी 302, 397, 460 नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवार (दि. 11) सायंकाळी 7 ते बुधवारी (दि. 12) सकाळी 9 च्या दरम्यान घडली होती. (Pune Crime)

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पारुबाई सावंत या भिलारेवाडी येथे एकट्याच राहत होत्या. आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश करुन पारुबाई यांचा गळा दाबून खून केला. यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, तसेच पत्र्याच्या पेटीतील रोख रक्कम व दागिने चोरुन घेऊन पळून गेला. आरोपीचा शोध घेत असताना तो उत्तर प्रदेशात पळून गेल्याची माहिती मिळाली. आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास पथक (Investigation Team) उत्तर प्रदेशात रवाना करण्यात आले.

 

पथकाकडून आरोपीचा शोध घेतला जात असताना तो सराई इनायत पोलीस ठाण्याच्या (Sarai Inayat Police Station) हद्दीत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी शनिवारी (दि.15) आरोपीला ताब्यात घेऊन तेथील न्यायालयात हजर करुन त्याची ट्रान्झिट रिमांड (Transit Remand) घेऊन पुण्यात आणण्यात आले.
आरोपीला पुण्यातील न्यायालयात हजर केले असता त्याला 21 जुलै पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलीस कोठडीत आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्याच्याकडून मयत महिलेच्या घरातून चोरलेले 2 लाख 500 रुपयांची रोख रक्कम तसेच 6 तोळे 8 ग्रॅम 90 मि. ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 5 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता यादव करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil),
सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Police Inspector Jagannath Kalaskar),
पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता यादव (Police Inspector Sangita Yadav)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक धीरज गुप्ता (PSI Dhiraj Gupta),
पोलीस अंमलदार आशिष गायकवाड, राहुल तांबे, धनाजी धोत्रे यांच्या पथकाने केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Bharti Vidyapeeth police arrests man who stole jewelery and cash after murdering woman seized 5.38 lakh worth of valuables

 

हे देखील वाचा :

Shivsena | उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! 14 खासदार शिंदे गटाच्या बैठकीला हजर

Pune Crime | सराईत गुन्हेगार गणेश चौधरी व अजय विश्वकर्मा पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार

Congress On GST | मोदीजी, किमान जनतेच्या श्वासावर तरी GST लावू नका – मोहन जोशी

 

Related Posts