IMPIMP

Ayurveda Expert Balaji Tambe | आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. बालाजी तांबे यांचे निधन कोरोनाने?

by nagesh
Ayurveda Expert Balaji Tambe | renowned ayurvedacharya balaji tambe died of coronavirus

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन मागील अनेक वर्ष योग, आयुर्वेद आणि संगीत या त्रिसूत्रीवर आधारित काम करत असलेले आयुर्वेदतज्ज्ञ बालाजी तांबे (Ayurveda Expert Balaji Tambe) यांचे निधन (Died) 10 ऑगस्ट रोजी पुण्यात (Pune) झाले. तांबे यांना पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यावेळी त्यांचं निधन झालं. त्यावेळी बालाजी तांबे (Ayurveda Expert Balaji Tambe) यांना कोरोनाची बाधा झाली नाही असा दावा त्यांच्या परिवाराकडून केला जात आहे. मात्र, तांबे यांचे निधन कोरोनाने झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

महापालिका (Municipal Corporation) क्षेत्रात कोरोनाने खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्यास संबंधिताच्या अंत्यविधीसाठी रुग्णालयाकडून ऑनलाइन पद्धतीने थेट स्मशानभूमीकडे मृत्यू दाखला दिला जातो.
दरम्यान, अन्य कारणांनी मृत्यू झालेल्या रुग्णांना असा दाखला दिला जात नाही.
देण्यात येतो.
तर, तांबे यांच्या बाबत त्यांचे निधन झालेल्या खासगी रुग्णालयातूनच ऑनलाइनद्वारे मृत्यू दाखला स्मशानभूमीकडे पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे.

 

याबाबत बालाजी तांबे याचे (Ayurveda expert Balaji Tambe) चिरंजीव डॉ. सुनील तांबे (Dr. Sunil Tambe) यांनी माहिती दिली आहे की, ’15 दिवसापूर्वी बाबांना ताप आला होता.
तेव्हा RTPCR टेस्ट केली असता रिपोर्ट (Corona report) निगेटिव्ह आला.
नंतर त्यांना थोडासा त्रास जाणवल्याने हॉस्पिटलमध्ये संबंधित सर्व टेस्ट केल्या.
सर्व रिपोर्ट (Corona report) सर्वसाधारण होता. नंतर अचानक निधन झाले.
आत्मसंतुलन व्हिलेजमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यांची सातत्याने तपासणी होते.
मात्र, काही दिवसांपूर्वी येथे 10-12 कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला.
मात्र, प्राथमिक स्तरांच्या उपचारांतच ते बरे झाले.
बाबांच्या वयाचा विचार करता खबरदारी म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.
त्यांच्या तपासण्या नकारात्मक होत्या.

 

Web Title : Ayurveda Expert Balaji Tambe | renowned ayurvedacharya balaji tambe died of coronavirus

 

हे देखील वाचा :

Pune Crime | तुझी ‘गारवा हॉटेलमालका’सारखी गत होईल; जमिनीच्या वादातून धमकी देणार्‍या 5 जणांवर FIR दाखल

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! पोलिस दलात महिला कर्मचार्‍यांची संख्या 10.30 टक्क्यांवरून वाढवून 33 % करण्याचे निर्देश

Pune Crime | कोंढव्यात युवकावर कोयत्याने सपासप वार करुन खुन; उपचारादरम्यान झाला मृत्यू

 

Related Posts