IMPIMP

Baramati Lok Sabha Election 2024 | स्थलांतरीत कामगारांच्या मतदानासाठी कृतीयोजना तयार करा; बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी

by sachinsitapure

पुणे : Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे यादृष्टीने कमी मतदान असलेल्या मतदान केंद्राबाबत सूक्ष्म नियोजन करावे आणि स्थलांतरीत कामगारांचे मतदान सुलभ होईल यासाठी कृतीयोजना तयार करावी, अशा सूचना बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी (Kavita Dwivedi IAS) यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला अपर जिल्हाधिकारी हनुमंत अरगुंडे, उपायुक्त समिक्षा चंद्राकार, बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त जिल्हास्तरीय समन्वयक अधिकारी उपस्थित होते.

श्रीमती द्विवेदी म्हणाल्या, मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी स्वीप कार्यक्रमावर अधिक भर द्यावा. स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या मतदानाबाबत माहिती द्यावी, यासाठी उद्योजक आणि व्यावसायिकांची मदत घ्यावी. वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना सुलभपणे मतदान करता येईल अशी व्यवस्था करण्यात यावी. मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेताना निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत सर्व 6 विधानसभा मतदारसंघातील वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्र निश्चित करून त्याची माहिती सादर करावी. अशा मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सर्व आवश्यक सुविधा असतील आणि अत्यंत सुलभपणे मतदान होईल अशी व्यवस्था करावी, असेही श्रीमती द्विवेदी म्हणाल्या.

यावेळी मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, ईव्हीएम व्यवस्थापन, स्वीप कार्यक्रम, माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण, टपाली मतदान, सुरक्षा व्यवस्था आदी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. जिल्हास्तरीय समन्वयक अधिकाऱ्यांनी विविध विषयांबाबत मार्गदर्शन केले.

Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष ‘वंचित’साठी दोन-दोन जागा सोडणार?

Related Posts