IMPIMP

BHR Scam | बीएचआरचा बडा मासा अखेर जाळ्यात ! सुनील झंवरच्या नाशिकमध्ये आवळल्या मुसक्या; पुणे पोलिसांची कारवाई

by nagesh
BHR Scam | economic offences wing of pune police arrested sunil zanwar at nashik in Bhaichand Hirachand Raisoni Scam

जळगाव न्यूज (Jalgaon News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)–  भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील Bhaichand Hirachand Raisoni Scam (बीएचआर) आर्थिक गैरव्यवहार (BHR Scam) प्रकरणातील बडा मासा सुनिल देवकीनंदन झंवर Sunil Devkinandan Zawar (रा. जय नगर, जळगाव) याला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (economic offences wing pune) पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. झंवर हा 9 महिन्यांपासून फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास नाशिकमधून (Nashik) पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकने अटक केली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

सुनिल झंवर याला अटक केल्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) अटकेची नोंद करण्यात आली.
त्यानंतर त्याला पुण्यात आणले जात असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुचेता खोकले (Police Inspector Sucheta Khokle) यांनी दिली आहे.
बीएचआर या संस्थेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याच पोलीस तपासात समोर आले आहे.
याप्रकरणी पुण्यातील डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) 25 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त शिक्षिका व ठेवीदार रंजना खंडेराया घोरपडे Ranjana Ghorpade (वय-65) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

 

 

रंजना घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीत फसवणुकीचा आकडा 17 लाख 8 हजार 742 इतका होता.
तर आतापर्यंत तपासात ही रक्कम 61 कोटी 90 लाख 88 हजार 163 रुपयांपर्यंत पोहोचली असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार व अवसायक जितेंद्र कंडारे (Jitendra Kandare) यालाही सात महिन्यानंतर 29 जून रोजी इंदूर येथून अटक करण्यात आली आहे. कंडारे सध्या कारागृहात आहे.

 

 

झंवर व कंडारे या दोघांना न्यायालयाने फरार घोषीत करण्याची प्रक्रिया सुरु केली होती.
जिल्हा व उच्च न्यायालयाने दोघांचा अटकपूर्व जामीन वेळोवेळी फेटाळून लावला होता.
झंवर हा वेशांतर करुन जळगाव, मुंबई, राजस्थान व इंदूर येथे वावरत होता.
9 महिने पुणे पोलीस त्याच्या मागावर होते.
झंवरला अटक करण्यासाठी पुणे पोलीसंनी सोमवार रात्रीपासून सापळा लावला होता.

 

 

Web Title : BHR Scam | economic offences wing of pune police arrested sunil zanwar at nashik in Bhaichand Hirachand Raisoni Scam

 

हे देखील वाचा :

Zika Virus | पुण्यातील 79 गावांत झिकाचा प्रादुर्भाव झाल्याची शंका; प्रशासन अलर्ट

Amit Shah | अमित शहांनी चंद्रकांत पाटील यांची भेट टाळली?

SBI च्या ग्राहकांना गंभीर इशारा ! 30 सप्टेंबरपूर्वी तुम्ही केले नाही ‘हे’ काम तर बंद होईल अकाऊंट, जाणून घ्या

PMSBY | फक्त 1 रुपया दरमहिना खर्च करा आणि मिळवा 2 लाखाचे ‘कव्हर’, ‘या’ पध्दतीनं करू शकता रजिस्ट्रेशन; जाणून घ्या

 

Related Posts