IMPIMP

SBI च्या ग्राहकांना गंभीर इशारा ! 30 सप्टेंबरपूर्वी तुम्ही केले नाही ‘हे’ काम तर बंद होईल अकाऊंट, जाणून घ्या

by nagesh
SBI | big alert for sbi customers if did not link pan to aadhaar before 30th september then your account will be closed

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  एसबीआय (SBI) च्या ग्राहकांसाठी एक खुप महत्वाची बातमी आहे. एसबीआय ग्राहकांनी डेडलाइनच्या आत हे महत्वाचे काम केले नाही तर त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. SBI बँक खातेसुद्धा बंद होऊ शकते. तुम्हाला पॅन म्हणजे कायम खाते नंबर 30 सप्टेंबरपूर्वी आधारसोबत लिंक करायचा आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

इन्कम टॅक्सने सुद्धा दिला इशारा

प्राप्तीकर विभागाने सुद्धा इशारा दिला आहे की 30 सप्टेंबरपर्यंत आधारसोबत पॅन लिंक न केल्यास पॅन निष्क्रिय होऊ शकते. प्राप्तीकर कायद्यांतर्गत हे काम न केल्यास 1,000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ने जारी केलेल्या एका नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, जर कुणी व्यक्तीने पॅनला आधार लिंक केले नसेल, आणि त्यानंतरही पॅन कार्डचा वापर केल्यास दंड केला जाईल.

 

 

असे करा पॅन-आधार लिंक

इन्कम टॅक्स ई-फायलिंग वेबसाइट https://incometaxindiaefiling.gov.in वर जा.

यानंतर क्लिक लिंक सेक्शनमध्ये Link Aadhaar वर क्लिक करा.

नंतर पॅन आणि आधार नंबर नोंदवा.

आधारमध्ये नोंदलेल्या नावाचा उल्लेख करा.

यानंतर आधारमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबर लिहा.

आता एक ओटी येईल.

जर मोबाइल नंबर आधारसोबत लिंक नसेल तर तुम्ही येथे ’I have only year of birth in Aadhaar card’ लिहू शकता.

आता I agree to validate my Aadhaar details with UIDAI वर क्लिक करा.

आता व्हेरिफिकेशनसाठी कॅप्चा कोड नोंदवा.

नंतर Link Aadhaar ची निवड करा.

आता आधार पॅन कार्डसोबत लिंक झाले.

 

 

एसएमएसद्वारे सुद्धा पॅनला आधारसोबत करू शकता लिंक

यासाठी मेसेज बॉक्समध्ये UIDPAN लिहून स्पेस द्या.

यानंतर 12 अंकाचा आधार नंबर लिहून स्पेस सोडा.

सर्वात शेवटी 10 अंकाचा पॅन म्हणजे कायम खाते नंबर हिला आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 567678 किंवा 56161 वर पाठवा.

 

Web Title : SBI | big alert for sbi customers if did not link pan to aadhaar before 30th september then your account will be closed

 

हे देखील वाचा :

PMSBY | फक्त 1 रुपया दरमहिना खर्च करा आणि मिळवा 2 लाखाचे ‘कव्हर’, ‘या’ पध्दतीनं करू शकता रजिस्ट्रेशन; जाणून घ्या

West Bengal Rape Case | BJP कार्यकर्त्याच्या पत्नीवर 6 जणांकडून सामूहिक बलात्कार, प्रचंड खळबळ

Gold Price Today | खुशखबर ! मागील 2 दिवसात सोनं 1700 रूपयांनी झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

 

Related Posts