IMPIMP

Drunk and Drive Action In Pune | पुणे : 142 तळीरामांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणी गुन्हा दाखल, वाहतूक विभागाची कारवाई

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Drunk and Drive Action In Pune | धुलिवंदनाच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी खबरदारी घेत ठिकठिकाणी नाकाबंदी लावली होती. त्याशिवाय संशयित ठिकाणी कारवाया केल्या. सोमवारी धुलिवंदन साजरे करत असताना मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या 142 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात सोमवारी स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्याकडून शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर एकूण 27 ठिकाणी विशेष नाकाबंदी करण्यात आली होती, अशी माहिती पुणे वाहतूक शाखेच पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar) यांनी दिली. (Pune Police News)

पुण्यात यंदा होळी आणि धुलिवंदन हा सण मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. मात्र या सणाला गालबोट लागू नये म्हणून पुणे पोलीसांनी कंबर कसली होती. तर पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने देखील रस्त्यावर उतरून कारवाई केली. पुण्यात वाहतूक पोलिसांनी दारू पिऊन वाहने चालू नये असे देखील आवाहन केले होते. मात्र, तरीदेखील मद्यपान करून वाहन चालवताना वाहन चालक आढळून आले. पुणे वाहतूक पोलिसांनी सोमवारी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत 142 दुचाकी वाहन चालक तळीरामांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कारवाई केली.

याशिवाय 226 वाहन चालकांना ट्रिपल सिट वाहन चालवल्याप्रकरणी दंड आकारण्यात आला. तसेच राँग साईडने वाहन चलवणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, कर्कश आवाजाची मॉडीफाय सायलेन्सर वापरणे, सिग्नल तोडणे अशा प्रकारच्या इतर 933 कायदेशीर कारवाया करुन दंड आकारण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केली.

Pune Mahavitaran News | विजेची मूलभूत गरज असूनही पश्चिम महाराष्ट्रात 8.87 लाख घरगुती ग्राहकांकडे 124 कोटींची थकबाकी

Related Posts