IMPIMP

Maharashtra Police Transfer | राज्यातील बहुप्रतिक्षित पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त; 1462 पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांच्या ‘ट्रान्सफर’

by bali123
Maharashtra Police Inspector Transfer | As many as 225 police inspectors transfers in state police force, read complete list

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –  Maharashtra Police Transfer | गेल्या काही दिवसांपासून होणार होणार म्हटल्या जात असलेल्या राज्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील 1462 पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या (Maharashtra Police Transfer) करण्यात आल्या आहेत.

आपला कालावधी पूर्ण केलेल्या 294 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून 123 निरीक्षकांच्या विनंती बदल्या केल्या गेल्या आहेत. विहीत कालावधी पूर्ण केलेल्या 312 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचाही यात समावेश आहे. याचबरोबर 48 सहायक निरीक्षकांच्या विनंतीवरुन त्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

404 पोलीस उपनिरीक्षकांचा या बदल्यांमध्ये समावेश आहे. तसेच 281 पोलीस उपनिरीक्षकांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत.

यासंबंधी पोलीस महासंचालक कार्यालयातील अपर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल
यांनी आदेश काढले आहेत. बदली झालेल्या पोलीस अधिकार्‍यांना तात्काळ कार्यमुक्त करावे. बदली
झालेल्या अधिकार्‍यांना कार्यमुक्त करताना पर्यायी/ बदलीवर येणार्‍या अधिकार्‍यांची घटक प्रमुखांनी
वाट पाहू नये़.

बदली झाली असल्याने कार्यमुक्त करुनही वेळेत बदलीवर हजर होणार नाहीत, अशा अधिकार्‍यांवर कार्यमुक्त केल्याचा दिनांक या कार्यालयास कळवून त्यांच्याविरुद्ध घटक प्रमुखांनी शिस्तभंग विषयक कार्यवाही तातडीने सुरु करावी, असे आदेशात म्हटले आहे.

Web Title : Maharashtra police transfer | transfer of 1462 police officer including police inspector api and psi

Pune News | बाबासाहेब पुरंदरेंचा शतक महोत्सवी वर्षारंभानिमित्त आशा भोसलेंच्या हस्ते भव्य सत्कार; शिवशाहीर म्हणाले – ‘लोकांचे मिळणारे प्रेम पाहून पुन्हा जन्म घ्यावासा वाटतो’

Jalna Crime | दोघा नराधमांचा अनाथ अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, जालना जिल्ह्यातील संतापजनक घटना

Ajit Pawar | कोरोना संसर्गाची तिसरी लाट ‘या’ महिन्यात येऊ शकते; अजित पवार म्हणाले… 

Related Posts