IMPIMP

Maharashtra Unlock | मुंबईला एक न्याय आणि पुण्याला दुसरा न्याय लावल्याने पुणेकरात संतापाची लाट; व्यापारी आंदोलनावर ठाम, आज शहरात 21 ठिकाणी घंटानाद

by nagesh
maharashtra unlock relaxation in maharashtra pune mayor murlidhar mohol asks why different treatment to mumbai and pune

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – (Maharashtra Unlock) राज्य सरकारने (State Government) सोमवारी रात्री ब्रेक द चेन (Break the Chain) अंतर्गत काढलेल्या अधिसूचनेत पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील निर्बंध कायम ठेवले आहेत. कोरोना रुग्ण (Corona Patient) संख्या घटल्याने निर्बंध शिथिल होतील, अशी अपेक्षा असलेल्या पुणेकरांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यातूनच पुणेकरांमधून संताप व्यक्त केला जात (Maharashtra Unlock) आहे. मुंबईला एक तर पुण्याला दुसरा न्याय लावल्याने  व्यापारी आक्रमक झाले असून त्यांनी रविवारी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आता आंदोलनावर व्यापारी ठाम आहेत. आज दुपारी १२ वाजता घंटानाद करण्यात येणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मुंबईत आता सातही दिवस दुकाने रात्री १० वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत. मुंबईत पॉझिटिव्ही रेट हा १.७६ टक्के आहे. त्याचवेळी पुणे शहराचा कालचा कोरोना बाधितांचे प्रमाण केवळ १.९ टक्के एवढे आहे. गेल्या आठवड्याभराचे प्रमाणे ३.४ टक्के होते. त्यामुळे निर्बंधातून पुणे शहराला सवलत मिळाली नाही. बाधितांचे प्रमाण कमी होत असल्याने पुण्यात निर्बंधात सवलत मिळावी, यासाठी व्यापार्‍यांनी सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंत, त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता व्यापार्‍यांचे आंदोलन सुरु होणार आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता गुडलक चौक ते ज्ञानेश्वर पादुका चौक दरम्यान मानवी साखळी करण्यात येणार आहे. त्यानंतर १२ वाजता शहरातील विविध २१ ठिकाणी घंटानाद करण्यात येणार आहे. यापुढे दररोज वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करुन व्यापारी शासनाचे लक्ष वेधणार आहे.

 

Web Title : maharashtra unlock relaxation in maharashtra pune mayor murlidhar mohol asks why different treatment to mumbai and pune

 

 

हे देखील वाचा :

TokyoOlympics | हॉकीतील भारताचे गोल्डचे स्वप्न भंगले, आता ब्रॉन्जसाठी लढाई

Fact Check | जर तुमच्याकडे आहे ‘आधार’ तर मोदी सरकार देतंय 1 टक्का व्याजावर कर्ज, जाणून घ्या वायरल मेसेजचे ‘सत्य’

Pune Corporation | कात्रज परिसरातील ‘उत्कर्ष’ मधील नागरिकांचा जीव धोक्यात; आधी रस्ता नंतर ‘ड्रेनेज’साठी खोदाई

Maharashtra Unlock | पुण्यासह 11 जिल्ह्यांत निर्बंध कायम ; राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी

Pune Crime Branch Police | जुन्या भांडणाच्या व उसने पैशाच्या कारणावरुन तरुणाचा सपासप वार करुन खून, 12 तासात 4 जणांना अटक

 

Related Posts