नवी दिल्ली : वृत्त संस्था – Fact Check | जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफार्म जसे फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरवर असाल तर सध्या एक मेसेज तुम्ही आवश्य पाहिला असेल, ज्यामध्ये दावा केला जात आहे की आधार कार्ड (Aadhaar Card) च्या माध्यमातून मोदी सरकार तुम्हाला केवळ 1 टक्के व्याजावर कर्ज देत (Fact Check) आहे.
जर अजूनपर्यंत तुम्ही अशा सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकला नसाल तर ठिक आहे, जर तुम्ही यांच्या दाव्याला फसून आपल्या डिटेल्स दिल्या तर तुमची मोठी फसवणूक होऊ शकते.
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update
दावा: #WhatsApp पर साझा किए जा रहे एक मैसेज में यह दावा किया जा रहा है कि प्रधानमंत्री योजना के तहत आधार कार्ड के माध्यम से 1% ब्याज पर लोन मिल रहा है। #PIBFactCheck: यह दावा फर्जी है। केंद्र सरकार द्वारा 'प्रधानमंत्री योजना' नामक ऐसी किसी योजना के तहत लोन नहीं दिया जा रहा है। pic.twitter.com/fGJpE4Bs4A
— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 2, 2021
पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये हा दावा बनावट निघाला आहे. पीआयबीने ट्विट करून सावध केले आहे की, PIBFactCheck : हा दावा बनावट आहे. केंद्र सरकारद्वारे ’प्रधानमंत्री योजना’ नावाच्या अशा कोणत्याही योजनेच्या अंतर्गत कर्ज दिले जात नाही.
पीआयबी भारत सरकारची धोरणे, कार्यक्रम आणि उपक्रमांबाबत वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला माहिती देणारी प्रमुख एजन्सी आहे.
Web Title : fact check if you have aadhaar then modi government is giving loan at 1 pc interest