IMPIMP

Maharera | ‘महारेरा’चा बिल्डरांना दणका ! पुणे जिल्ह्यातील 189 प्रकल्प ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये; फ्लॅट बुक करताना घ्या काळजी, पाहा यादी

by nagesh
maharera blacklists 189 projects pune know about it

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)मागील दीड वर्षापासुन कोरोनाने लोकं हतबल झाली आहेत. अनेकांचा व्यवसाय गेला तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अशातच आता, महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणने (महारेराने) (Maharera) कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘महारेराने’ (Maharera) राज्यातील 644 गृहबांधणी प्रकल्पांना ब्लॅक लिस्टमध्ये (Black list) टाकले आहे. 2017 ते 2019 या 3 वर्षांमध्ये प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या प्रकल्पांना रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथोरिटी म्हणजेच महारेराकडून ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील (Pune District) 189 प्रकल्पांचा समावेश आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

644 गृहबांधणी प्रकल्पांना (Housing projects) काळ्या यादीत टाकल्याने या बांधकाम व्यावसायिकांना
आता प्रकल्पातील कोणत्याही मालमत्तेची कोणताही व्यवहार करता येणार नाही. तसेच बांधकाम देखील करतां येणार नाही. याचबरोबर पुण्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्प (Lavasa Project) देखील 2017 पासून बंद असल्याचे देखील उघडकिस आलं आहे. सध्या ब्लॅक लिस्टमध्ये (Black list) टाकलेल्या प्रकल्पांची टक्केवारी संपूर्ण राज्याच्या तुलनेत पुण्यातील 29 टक्के असल्याची माहिती समोर आलीय. पुण्यात 2017 पासून बंद असलेल्या प्रकल्पांची नावे देखील समोर आली आहेत. यांना देखील काळ्या यादीत टाकलं आहे. यामुळे आता बांधकाम व्यावसायिक मध्ये खळबळ माजली आहे.

 

 

या दरम्यान, महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणने (महारेराʼ) (Maha Rera) जारी करण्यात आलेल्या लिस्टमध्ये अनेक नावे देखील तांत्रिक त्रुटींमुळे समावेश झाली आहेत. महारेराकडे नोंदणी (Registration) केल्यानंतर 3 वर्षांनी त्या नोंदीची मुदत संपते. ती मुदत संपण्यापूर्वी जर बांधकाम व्यावसायिकाने सर्व सदनिका, गाळे विकले असतील मात्र 3 वर्षाच्या मुदतीनंतर महारेराला रिपोर्ट सादर केला नसेल तर तो व्यावसायिक त्यांच्या दृष्टीने दोषी ठरतो. त्याचा परिणाम संबंधितांना काळ्या यादीत (Black list) टाकण्यात झाल्याचे आम्हाला आढळून आले. म्हणून प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्र विचार करूनच पडताळणी करावी लागेल, अशी माहिती क्रेडाईचे (CREDAI) राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारीया (Shantilal Kataria) यांनी दिली आहे.

 

 

पुणे जिल्ह्यासह राज्यातील ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेल्या इतर नावांची संपूर्ण यादी लिंकमध्ये –

https://maharera.mahaonline.gov.in/Site/1128/Lapsed-Projects

 

Web Title : maharera blacklists 189 projects pune know about it

 

हे देखील वाचा :

PMRDA | पीएमआरडीएकडून विकासकामांसाठी 817.5 लक्ष रुपयांचा निधी मंजूर; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना मिळाले यश

Child Pornography | महाराष्ट्रात Child Pornography च्या प्रकरणात प्रचंड वाढ; धक्कादायक माहिती समोर

SSY | तुम्हाला सुद्धा उघडायचे असेल सुकन्या समृद्धी योजनेत खाते तर ‘या’ कागदपत्रांची आहे आवश्यकता, जाणून घ्या नियम?

 

Related Posts