IMPIMP

Marged Villages In PMC | पुणे : समाविष्ट 34 गावांच्या मूलभूत सोयी सुविधासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये 9 लोकप्रतिनिधींची सदस्यपदी नियुक्ती पांडुरंग खेसे, बाबुराव चांदेरे, दत्तात्रय धनकवडे, राकेश कामठे, भगवान भाडळे, शांताराम कटके, गणेश ढोरे, राहुल पोकळे आणि अजित घुले यांचा समावेश

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्त्ता ऑनलाइन – Marged Villages In PMC | पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या 34 गावांतील मूलभूत सोयी सुविधांसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 9 लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात आली आहे. समाविष्ट गावांतील विकास कामे या समितीच्या माध्यमातून केली जाणार आहेत. याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाचे उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी दिले आहेत. पुणे महापालिकेच्या हद्दीत सन 2017 मध्ये 11, तर सन 2021 मध्ये 23 अशी एकूण 34 गावे राज्य सरकारकडून समाविष्ट करण्यात आली. (Margined Villages In PMC)

सदस्यपदी नियुक्ती झालेल्या लोकप्रतिनिधीचे नाव कंसात गावाचे नाव
पांडुरंग एकनाथ खेसे (लोहगाव-वाघोली)
बाबुराव दत्तोबा चांदेरे (सूस, म्हाळुंगे, बावधन)
दत्तात्रय बबनराव धनकवडे (नऱ्हे, शिवणे, उत्तमनगर, धायरी)
राकेश राजेंद्र कामठे (उंड्री, पिसोळी, वडाचीवाडी)
भगवान लक्ष्मण भाडळे (मंतरवाडी, देवाची ऊरुळी)
शांताराम रंगनाथ कटके (कटकेवाडी, वाघोली)
गणेश बाळासाहेब ढोरे (ढोरेवस्ती, फुरसुंगी, भेकराईनगर)
राहुल सदाशिव पोकळे (धायरी, पुणे)
अजित दत्तात्रय घुले (मांजरी बु. ता. हवेली, पुणे)

Shivsena UBT Leader Ambadas Danve | उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का?, नाराज अंबादास दानवे यांनी स्वत: केला खुलासा, ”एकनाथ शिंदेंबरोबर…”

Related Posts