IMPIMP

PM Modi Temple Pune | पुण्यातील ‘मोदीभक्ता’नं उभारलं PM नरेंद्र मोदी यांचं मंदिर (व्हिडीओ)

by nagesh
PM Modi Temple Pune | construction narendra modi temple modi bhakt

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन येथील औंध गावात (Aundh village) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या दिवशी पुण्यात चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिराची उभारणी (PM Modi Temple Pune) करण्यात आली आहे. मयूर मुंडे या भाजप कार्यकर्त्याने मंदिराची उभारणी केली असून मंदिरात मोदी यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर तेथे एक फलक झळकावण्यात आला असून त्यावर मोदींच्या कार्यावर आधारित काव्याची रचना करण्यात आली आहे. पुण्यातील मोदींचे हे पहिलेच मंदिर (PM Modi Temple Pune) असून, देशपातळीवरही या प्रकारचे पहिलेच मंदिर असल्याचा दावा केला जात आहे.

 

 

 

मयूर मुंडे (Mayur Munde) यांनी स्वत:च्या मालकीच्या जागेत मोदी यांचं मंदिर उभारले आहे.
यांसंदर्भात बोलताना मयूर मुंडे म्हणाले की, मोदींकडून आपल्याला प्रेरणा मिळते त्यासाठी मंदीराची उभारणी केली.
या मंदिरावरून ट्रोल केलं गेलं तरी चालेल असे त्यांनी सांगितले.

हे मंदिर औंध येथील अ‍ॅड. मधुकर मुसळे (Adv. Madhukar Musle) यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलं.
मोदींचा पुतळा पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी (Diwanshu Tiwari) यांनी तयार केला असून यासाठी एक लाख 60 हजार रुपये खर्च झाले आहे.
या मंदिराचे उदघाटन स्वातंत्रदिनी ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते करण्यात आले.
मंदिरासमोर मयूर मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता ‘मोदी भक्तां’साठी लावण्यात आली आहे.
कवितेच्या आधारे आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाचा उल्लेख ही मांडला आहे.

 

Web Title : PM Modi Temple Pune | construction narendra modi temple modi bhakt

 

हे देखील वाचा :

Governor Bhagat Singh Koshyari | शरद पवारांच्या टीकेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

Shrimant Kokate | ‘पुणे कोणाच्या बापाचं नाय’ हे मनसेनं लक्षात ठेवावं’

Pune Crime | खरेदीसाठी आलेल्या महिलांनी हात चालाकीने पळवले सोन्याचे ब्रेसलेट

 

Related Posts