IMPIMP

ITR दाखल करताना करू नका ‘या’ 6 चूका, याच महिन्यात भरायचाय इन्कम टॅक्स रिटर्न, चूक पडू शकते महागात

by nagesh
Income Tax Raid | income tax raid on anil parbas ca house in mumbai MIG Bandra

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणे त्या सर्वांसाठी आवश्यक आहे ज्यांची वार्षिक कमाई 2.5 रुपयांपेक्षा जास्त आणि वय 60 वर्षापेक्षा कमी आहे. असे सीनियर सिटिजन ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाइल करण्यात सूट दिली आहे. सुपर सीनियर सिटिजन म्हणजे ज्यांचे वय 75 वर्षापेक्षा जास्त आहे, त्यांना ITR फाइल करण्याची आवश्यकता नाही, पण त्यांच्या इन्कमचे माध्यम पेन्शन आणि डिपॉझिटवर मिळणारे व्याज आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

ITR फायलिंक करू नका या चूका

आर्थिक वर्ष 2020-21 (एफवाय 2021-22) साठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची डेडलाइन 30 सप्टेंबर 2021 आहे. जर पुढे जाऊन ही डेडलाइन वाढली तरी सुद्धा टॅक्सपेयर्सने आपला रिटर्न या महिन्यात भरला पाहिजे. कारण जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर या जबाबदारीतून सूटका करणे चांगले आहे.

परंतु आयटीआर दाखल करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कारण काही छोट्या-छोट्या चूका पुढे जाऊन मोठ्या समस्या होऊ शकतात. यासाठी चूका टाळा.

 

 

1. सेव्हिंग अकाऊंटचे व्याज

सेव्हिंग अकाऊंटवर मिळत असलेले व्याज कमाई म्हणून आयटीआरमध्ये दाखले पाहिजे. इन्कम टॅक्स सेक्शन 80 TTA अंतर्गत वैयक्तिक सेव्हिंग अकाऊंटवर 10,000 रुपयांपर्यंत व्याज कमाईवर सूट आहे. तर सिनियर सिटीजनसाठी ही सूट 50,000 रुपये आहे.

 

 

2. FD चे व्याज आयटीआरमध्ये दाखवा

FD तून मिळणारे व्याज टॅक्सच्या कक्षेत येते, यासाठी ते आयटीआरमध्ये दाखवा.

 

 

3. योग्य आयटीआर फॉर्म भरा

उत्पन्नाच्या स्त्रोताच्या आधारावर वेगवेगळे आयटीआर फॉर्म असतात, तुमच्यासाठी आवश्यक तो निवडा.

 

 

4. ई-व्हेरिफिकेशन करा

आयटीआर दाखल केल्यानंतर आठवणीने ई-व्हेरिफिकेशन करा. हे 120 दिवसांच्या आत आवश्यक आहे.

 

 

5. नवी आणि जुनी टॅक्स सिस्टम न समजणे

सध्या नवीन आणि जुनी दोन प्रकारची टॅक्स सिस्टम आहे. दोन्हीची तुलना करून तुम्ही निवड केली पाहिजे. यानंतरच टॅक्स भरा.

 

 

6. डिव्हिडंट इन्कम न सांगणे

वैयक्तिक इक्विटी आणि म्युचुअल फंडमधून डिव्हिडंटद्वारे कमाई केली असेल त्यावर टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स लागतो यासाठी यंदा आयटीआरमध्ये डिव्हिडंट इन्कम सुद्धा दाखवावे लागेल.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

Web Title : ITR | income tax return do not make these 6 mistakes while filing itr income tax return is to be filed this month

 

हे देखील वाचा :

Virus | भारतात पसरलीय कोरोनापेक्षा सुद्धा भयंकर महामारी ! 12 वर्षाच्या मुलाने पसरवला ‘विध्वंस’

Pune Amenity Space | अ‍ॅमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावावरून भाजप नगरसेवकांमध्येच फूट पडली पडल्याची मनपा वर्तुळात चर्चा

Pune Crime | ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणार्‍या तरुणीने प्रियकराचा घोटला ‘गळा’; पुण्याच्या फुरसुंगीमधील घटना

 

Related Posts