IMPIMP

Social Media | उकळत्या पाण्यात हात जोडून बसला निष्पाप बालक, 23 सेकंदाच्या Video ने लोकांना केले ‘हैराण’

by nagesh
Social Media | viral video shows a boy sitting in boiling water netizens call it fake

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Social Media | सोशल मीडियावर एका लहान मुलाचा अतिशय धक्कादायक व्हिडिओ वायरल होत आहे. यामध्ये जे काही दिसत आहे ते पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. वायरल व्हिडिओमध्ये मुलगा गरम कढईत समाधी मुद्रेत बसलेला दिसत आहे. मात्र, या व्हिडिओवरून सोशल मीडियावर (Social Media) संताप व्यक्त होत आहे. लोक वेगवेगळी चर्चा करत आहेत. लोक हे फेक असल्याचे म्हणत आहेत. अवघ्या 23 सेकंदाचा हा व्हिडिओ जवळपास 20 लाखवेळा पाहिला गेला आहे. परंतु व्हिडिओमध्ये जे काही दिवस आहे ते भयंकर आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

वायरल व्हिडिओ क्लिप मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर @iSandeepBisht नावाच्या अकाऊंटवरून शेयर केली आहे.
या पोस्टवर दोन हजार आठशे रिट्विट आणि नऊ हजारपेक्षा जास्त लाइक्स आहेत.
संदीप बिष्टने मुलांचा व्हिडिओ शेयर करत कॅपशनमध्ये लिहिले आहे, हा 2021 चा भारत आहे.

 

 

व्हिडिओमध्ये एक मुलगा उकळत्या पाण्याच्या कढईत बसलेला दिसत आहे.
कढईच्या खालून आग पेटवलेली दिसत आहे. तसेच, आजबाजूला लोक जमले आहेत.
सर्वजण मुलाकडे एकटक पहात आहेत.

हैराण करणारी बाब म्हणजे मुलाला काढण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही.
व्हिडिओत मुलगा उकळत्या पाण्यात हात जोडून शांत बसलेला आहे.
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की पाणी वेगाने उकळत आहे.
पाण्यात चारी बाजूने फुले आहेत. मुलांवर उकळत्या पाण्याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही.

एका यूजरने या व्हिडिओवर प्रश्न विचारला आहे की, मुलाला जिवंत का शिजवत आहात?
तसेच अनेक लोकांनी यावर संताप व्यक्त करत हा प्रकार फेक असल्याचे म्हटले आहे.
पाण्यात हवा सोडून ते उकळत असल्याचा भास निर्माण केला असल्याचे काहींनी म्हटले आहे.

 

Web Title : Social Media | viral video shows a boy sitting in boiling water netizens call it fake

 

हे देखील वाचा :

ITR दाखल करताना करू नका ‘या’ 6 चूका, याच महिन्यात भरायचाय इन्कम टॅक्स रिटर्न, चूक पडू शकते महागात

Virus | भारतात पसरलीय कोरोनापेक्षा सुद्धा भयंकर महामारी ! 12 वर्षाच्या मुलाने पसरवला ‘विध्वंस’

Pune Amenity Space | अ‍ॅमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावावरून भाजप नगरसेवकांमध्येच फूट पडली पडल्याची मनपा वर्तुळात चर्चा

 

Related Posts