IMPIMP

Pune Chandan Nagar Police | खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला चंदननगर पोलिसांकडून अटक

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Chandan Nagar Police | चंदननगर परिसरात पार्किंगच्या वादातून एका महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाण्याचा प्रयत्न केला (Attmept To Murder). हा प्रकार 17 फेब्रुवारी रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास खराडी परिसरातील तुकाराम नगर (Tukaram Nagar Kharadi) येथे घडला होता. याप्रकरणी दहा जणांना यापूर्वीच अटक केली आहे. मात्र, दाखल गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार धीरज सपाटे हा एक महिन्यापासून फरार होता. अखेर चंदननगर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

चंदननगर परिसरात पार्किंगच्या वादातून गाड्यांची तोडफोड करुन जाळण्यात आल्या. धक्कादायक म्हणजे आरोपींनी एका महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र महिला घरात पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी आयपीसी 307, 427, 435, 308, 143, 147, 148,149 सह आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला.

दाखल गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार धिरज दिलीप सपाटे Dheeraj Dilip Sapate (वय-25 रा. तुकारामनगर, खराडी) एक महिन्यापासून फरार होता. तो पिंपरी-चिंचवड, धायरी, कोंढवा, अहमदनगर, बीड अशी वेगवेगळे ठिकाणे बदलुन पोलिसांना गुंगारा देत होता. पोलीस त्याचा शोध घेत असताना त्याची माहिती तपास पथकाला समजली. पोलिसांना पाहून पळून जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 विजय मगर (DCP Vijaykumar Magar), सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग संजय पाटील (ACP Sanjay Patil), वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील (Sr PI Manisha Patil), पोलीस निरीक्षक (गुन्हे) पंडित रेजितवाड (PI Pandit Rejitwad) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तान्हाजी शेगर (PSI Tanhaji Shegar), पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, श्रीकांत शेंडे, विष्णु गोने, महेश नाणेकर, सचिन रणदिवे, शिवाजी धांडे, गणेश हांडगर, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, नामदेव गडदरे, विकास कदम, ज्ञानोबा लहाणे यांच्या पथकाने केली.

Sanjay Raut On Mahayuti | महायुतीच्या नेत्यांवर संजय राऊतांचा हल्लाबोल, गुलाम, मांडलिक, आश्रितांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात, वंचितबाबत म्हणाले…

Related Posts