IMPIMP

Pune Congress | स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसचा युटर्न, पुणे महापालिका निवडणुकीसाठी आघाडीची तयारी (व्हिडीओ)

by nagesh
Pune Congress | Uterus of Congress, which speaks the language of fighting on its own, is preparing for the Pune Municipal Corporation elections

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन  – स्थानिक स्वराज्य निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेसने (Pune Congress) यापूर्वी जाहीर केले होते. मात्र, आता काँग्रेसने (Pune Congress) युटर्न घेत आपली भूमिका बदलली आहे. भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने पुणे महापालिका निवडणुकीत (Pune Municipal Election) आघाडी करण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपला हरविण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात असे राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

आगामी महापालिका निवडणुकीत तीन सदस्यांचा प्रभाग (three members Ward) करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत (cabinet meeting) घेतला आहे. यापूर्वी काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body election) स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अनेकवेळा याबाबत सांगितले. मात्र, तीनचा प्रभाग झाल्यानंतर काँग्रेसची भूमिका बदलली आहे का असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांना विचारण्यात आला.

 

 

बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेस (Congress),  काँग्रेस राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (Shivsena) हे तिन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत. आम्ही एकत्र राज्य सरकारमध्ये (State Government) आहोत. चांगल्या पद्धतीने सरकार चालवत असून आम्ही एकत्रच आहोत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हा आमचा उद्देश आहे. ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे तेथे आम्ही एकत्रच जात असल्याचे थोरात यांनी सांगितले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

प्रभाग रचनेकडे पक्षीय दृष्टीकोनातून बघू नका

तीन प्रभाग रचनेबाबत थोरात म्हणाले, महापालिका निवडणुकीबद्दल आमच्यात मतमतांतरे होती.
पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमच्यात चर्चा झाली, पण वाद झाले नाहीत.
प्रभाग रचनेकडे पक्षिय दृष्टीकोनातून बघू नये, हे निर्णय फक्त सत्ताधाऱ्यांच्या फायद्याचे नाहीत तर सर्वांच्या फायद्याचे आहेत.
निवडणुकीमध्ये जास्त जणांना समावून घेण्यासाठी तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याला पक्षीय स्वरूप नसल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. (Pune Congress)

 

Web Title :- Pune Congress | Uterus of Congress, which speaks the language of fighting on its own, is preparing for the Pune Municipal Corporation elections

 

हे देखील वाचा :

Air India चे खासगकीकरण ! Tata लिलाव जिंकल्याच्या बातम्या, परंतु सरकारने नाकारले

Multibagger stock | 11.90 रुपयांच्या शेयरने गुंतवणुकदारांना केले मालामाल ! 1 लाखाचे झाले 80 लाख, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

Kolhapur Crime | … म्हणून वडिलानं पोटच्या 5 वर्षाच्या मुलाला फेकलं पंचगंगा नदीत; इचलकंरजीतील धक्कादायक प्रकार

 

Related Posts